खंडाळा : महान्यूज लाईव्ह
सातारा तालुक्यातील लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत फलटण तालुक्यातील पांढरी तरडगाव येथे 12 एप्रिल रोजी करण्यात आलेला लहान मुलाचा खून हा त्याच्या आईने केल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान हा खून कशासाठी करण्यात आला? याचा तपास लोणंद पोलीस करत असून यामागे अनैतिक संबंधाचे कारण आहे की अन्य काही; याची चौकशी पोलीस करत आहेत.
2 एप्रिल 2022 रोजी पांढरी तरडगाव गावातील महिला आरती सोमनाथ गायकवाड हिने लोणंद पोलिसांना फोन करून मी माझ्या लहान बाळाला जिवे मारून पुरलेले आहे, तुम्ही गाडी लगेच पाठवा. नाहीतर मी आणखी दुसरा कोणाचा तरी कोण करेल अशी धमकी दिली होती. त्यावरून लोणंद पोलिसांनी आरती गायकवाड तिला तातडीने ताब्यात घेतले व तिच्याकडे चौकशी केली.
तेव्हा तिने तिच्या पाच महिन्याच्या लहान बाळाला मारल्याचे उघडकीस आले. आरती गायकवाड हिने तिचा पाच महिन्यांचा लहान मुलगा कार्तिक सोमनाथ गायकवाड यास ब्लॅंकेट मध्ये गुंडाळून खुशीने नाकतोडे दाबले व त्याचा जीव घेतला. त्यावरून पोलिसांनी तिच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
न्यायालयाने तिला चार दिवस पोलिस कोठडी दिली असून या खुनाचे कारण लोणंद पोलीस शोधताहेत. लोणंद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विशाल वायकर हे या पुढील तपास करत असून या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे व उपविभागीय पोलिस अधिकारी शीतल जानवे खराडे यांनी या तपासाबाबत मार्गदर्शन केले.