दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड पोलीस स्टेशनच्या हद्दीत मागील तीन दिवसात तीन तरूणी बेपत्ता झाल्याची तक्रार दौंड पोलीस स्टेशनला दाखल झाली आहे. यामध्ये इयत्ता बारावीची एक अल्पवयीन विद्यार्थिनी, वीस वर्षीय तरूणी तर बावीस वर्षीय विवाहीत महिलेचा समावेश आहे. या बेपत्ता युवतींचा शोध सध्या दौंड पोलीस घेत आहेत, अशी माहिती दौंड पोलीसांनी दिली.
दौंड शहरातील मानसी विजय त्रिभुवन ( वय २०, मुळ रा. मनमाड ता. नांदगाव, जि.नाशिक सध्या रा.सिध्दार्थनगर ता. दौंड. जि. पुणे.) ही तरूणी शुक्रवारी ( दि. 22 ) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातून बेपत्ता झाली आहे. मानसी ही तिची बहिण सौ.अश्विनी प्रतिक पगारे ( वय 22 रा. सिध्दार्थनगर दौंड) ही गरोदर असल्यामुळे गेली दिड महिन्यांपासुन सिध्दार्थनगर येथे राहत होती. शुक्रवारी दुपारी तिची बहिण व पती झोपले असताना एक वाजण्याच्या सुमारास मानसी घरातून कोणाला काही न सांगता निघून गेली. याबाबत अश्विनी हिने तिची आई अनिता यांना फोन करून हा प्रकार सांगितला. पगारे यांनी मानसी हिचा परीसरामध्ये शोध घेतला असता तिचा शोध लागला नाही. याबाबत तिची बहिणी अश्विनी पगारे यांनी दौंड पोलीस स्टेशनला खबर दिली आहे. मानसी विजय त्रिभुवन ( वय २० ) रंग गोरा, डोळे काळे, उंची ४ फुट५ इंच, केस काळे लांब, नाक-सरळ, बाधा- सडपातळ नेसणीस – डिर रंगाचा टॉरंगाची लेगीज, भाषा मराठी.
तालुक्यातील बोरीबेल येथील इयत्ता बारावीत शिकणारी काजल आण्णा खळदकर ( वय १७ वर्षे ११ महीने ) ही अल्पवयीन मुलगी शनिवारी ( दि.२३ ) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातून बाथरूमला जाते असे सांगुन निघुन गेली. तिला घरी येण्यास जास्त वेळ झाल्यानंतर ती घरी न आल्याने तिचे आई-वडील व भावाने घरापासून काही अंतरावर असलेल्या आजी- आजोबा यांच्या घरी शोध घेतला तसेच गावांमध्ये व आजुबाजुच्या परीसरामध्ये शोध घेतला परंतु तिचा शोध लागला नाही. याबाबत तीची आई सौ. मिनाक्षी आण्णा खळदकर
यांनी दौंड पोलीस स्टेशनला खबर दिली. काजल हिने नुकताच बारावीचा पेपर दिला आहे. तिचा रंग-काळासावळा, डोळे काळे, उंची ५ फुट ६ इंच, केस काळे, लांब, नाक-सरळ, बांधा सडपातळ, नेसणीस-लाल रंगाचा टि शर्ट, जांभळ्या रंगाची पॅन्ट, भाषा- मराठी.
तसेच गोपाळवाडी येथील सौ. सिमोन रोहन सोनवणे ( वय २२ ) ही विवाहीत महिला शनिवारी ( दि,२३ ) रात्री अडीज वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातून निघून गेली आहे. तिचा आजुबाजुच्या परीसरामध्ये शोध घेतला असता ती दिसली नाही. याबाबत पती रोहन राजेंद्र सोनवणे यांनी दौंड पोलीस स्टेशनला खबर दिली आहे. तिचा रंग-गोरा, डोळे काळे, उंची ४ फुट ५ इंच, केस काळे व लांब, नाक-सरळ, बांधा सडपातळ, नेसणीस- पिवळे रंगाचा टपकाळे रंगाची नाईट पॅंन्ट भाषा मराठी.
दरम्यान, याबेपत्ता तरूणींची कोणाला माहिती मिळाल्यास दौंड पोलीस स्टेशनला संपर्क साधवा असे आवाहन दौंड पोलीसांनी केले आहे.
दौंड तालुक्यात अल्पवयीन मुलींसह विवाहीत महिला बेपत्ता होण्याच्या प्रकारात वाढ झाल्याचे चित्र आहे. बहुतांश ही बेपत्ता प्रकरणे ही प्रेमप्रकरणातून होत असल्याचे पोलीस तपासात यापुर्वी अनेक वेळा निष्पन्न झाले आहे. असे प्रकार का वाढतात याला अनेक कारणे असू शकतात मात्र शालेय विद्यार्थिनी,अल्पवयीन मुली आणि विवाहीत महिला घरातून निघून जाणे हा कुटूंबासाठी मोठा चिंतेचा विषय ठरत आहेत. सगळ्याच घटना या प्रेमप्रकरणातून होतात असे म्हणता येणार नाही. मात्र बहुतांश प्रेमप्रकरणातून असे प्रकार घडत असल्याचे यापु्र्वी पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. मात्र असे प्रकाराला आळा बसण्याची आवश्यकता असून पालकांनी विशेष दक्षता व काळजी देण्याची आवश्यकता आहे.