मुंबई : महान्यूज लाईव्ह
दिल्लीनंतर पंजाबमध्ये मिळविलेल्या यशामुळे आद आदमी पक्षाने सगळ्या देशभरात आपला विस्तार करण्यासाठी कंबर कसली आहे. आसामची राजधानी गुवाहाटी महापालिकेच्या निवडणूक आम आदमी पार्टी पुर्ण ताकदीने लढली. या महापालिकेच्या निवडणूकीत १ जागा मिळविण्यात या पक्षाने यश मिळविले आहे.
६० जागांवर झालेल्या या निवडणूकीत भाजपाने ५८ जागा मिळवून प्रचंड मोठे यश मिळविले आहे. कॉंग्रेसला या निवडणूकीत एकही जागा मिळवता आलेली नाही. परंतू आम आदमी सारख्या तुलनेने छोट्या पक्षाने मात्र १ जागेवर यश मिळविले आहे.
दरम्यान आजच गुजराथमध्ये कॉंग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे.