सुरेश मिसाळ
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
निमगाव केतकी विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली असून या सोसायटीवर भाजपाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
भाजप नेते अंकुश जाधव व देवराज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तुषार जाधव यांनी या निवडणुकीत विशेष लक्ष दिले होते. तुषार जाधव यांच्या प्रयत्नांना यश आले असून निमगाव केतकीच्या विविध कार्यकारी सोसायटीवर एकदा एकदा भाजपाचे पूर्णपणे वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले आहे.
सोसायटीच्या चेअरमन पदी विठ्ठल तुकाराम नाळे व व्हाईस चेअरमन पदी गौतम नामदेव हेगडे यांची निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून एम.पी.राऊत व सचिव युनूस पठाण यांनी निवडणुकीचे काम पार पाडले. या निवडणुकीत सर्व सभासद व समस्त ग्रामस्थ तसेच नूतन संचालक उपस्थित होते.