मुंबई : महान्यूज लाईव्ह
या वर्षीची जीएसटीची बैठक पुढील काही महिन्यात होणार आहे. या बैठकीत १४३ वस्तूंवरील जीएसटी वाढविण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. या बैठकीनंतर या वस्तू नक्कीच महाग होतील.
पापड, गुळ, पॉवर बॅंक, घड्याळे, सुटकेसेस, हॅन्डबॅंग्ज, परफ्युम, ३२ इंचापेक्षा कमी आकाराचे रंगीत टिव्ही सेटस, चॉकलेट्स, च्युइंगम, अक्रोड, सॉफ्टडिंक्स, सिरॅमिक सिंक, वॉश बेसिन, गॉगल, चष्मा किंवा गॉगलसाठीच्या फ्रेम, लेदरचे कपडे या वस्तूंचा यामध्ये समावेश आहे.
या १४३ पैकी ९२ वस्तू या १८ टक्के स्लॅबमधून २८ टक्के स्लॅबमध्ये टाकण्याचा प्रस्ताव आहे. पापड आणि गुळावर यापुर्वी ० टक्के जीएसटी होता. आता यावर ५ टक्के जीएसटी आकारण्याचा प्रस्ताव आहे. अक्रोडवरील ५ टक्के जीएसटी वाढवून १२ टक्क्यावर नेण्याचा प्रस्ताव आहे. कस्टर्ड पावडर ५ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर, लाकडी टेबल आणि किचनवेअरवरील जीएसटी १२ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर नेण्याचा प्रस्ताव आहे.
या प्रस्तावांना फारसा विरोध होण्याची शक्यता नाही. जीएसटी कररचना सुरु झाली त्यावेळी केंद्राने राज्यांना पहिली पाच वर्षे जीएसटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याचे मान्य केले होते. आता ही पाच वर्षे पुर्ण झालेली आहेत. त्यामुळे यापुढे केंद्राकडून जीएसटीवर झालेल्या तुटीबाबत कोणताही निधी मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे एकुणच जीएसटीचे करसंकलन वाढविण्याकडे राज्यांचा कल राहणार आहे. त्यामुळे काही अपवाद वगळता वरील सर्व प्रस्ताव मंजुर होण्याची शक्यता आहे.
अर्थातच यामुळे वाढत्या महागाईत आणखी भर पडणार आहे.