दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथे तब्बल एक लाख पंधरा हजार किंमतीचा तांब्याचा पाणी तापवण्याचा बंब, पाणबुडी मोटार यासह एक लाख चाळीस हजारांचा ऎवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे.अशी माहिती दौंड पोलीसांनी दिली आहे.
कुरकुंभ परिसरातील गिरमेवस्ती येथे शुक्रवारी ( दि.२२ ) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, गिरमेवस्ती येथील सौ. सुनंदा सुभाष शिंदे यांच्या घरासमोर असलेल्या मोकळे जागेत ठेवलेला एक लाख पंधरा हजार किंमतीचा तांब्याचा पाणी तापविणेचा बंब, १० हजार किंमचीची ५ एच.पी. पाणबुडी मोटार तसेच १५ हजार किंमतीचे इतर साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून पोबारा केला आहे. याबाबत निलेश दादासाहेब शिंदे यांनी दौंड पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अज्ञात चोरांचा दौंड पोलीस शोध घेत आहेत