संदीप मापारी पाटील
बुलढाणा : महान्यूज लाईव्ह
जुन्या काळामध्ये शहरात गाव खेड्यावर मोठ्या प्रमाणात लग्न कार्यामध्ये पळसाच्या पानाची पात्रवाळी लग्नसमारंभ व इतर कार्यामध्ये जेवणासाठी वापरल्या जायची. परंतु सध्याच्या प्लास्टिकच्या जमान्यात ही पात्रवाळी नामशेष होण्याच्या मार्गावर दिसत आहे. शहरात व गाव खेड्यामध्ये सर्वत्र प्लास्टिकच्या पात्रवाळीचा वापर मोठ्या प्रमाणात केले जात असून कधीकाळी गाव खेड्यातील सर्व मंडळी पारावर एकत्र येऊन सामाजिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वयोवृद्ध व गावातील काही मंडळी मिळून लग्न समारंभ शुभकार्यासाठी तसेच मरणा व तोरणदारी पळसाच्या पानांची पात्रवाळी बनवताना मोठ्या प्रमाणात दिसायची.
कार्याची सुरुवातच पात्र वाळी पासून सुरू व्हायची परंतु सध्याच्या हायटेक जमान्यामध्ये प्लास्टिकच्या मोठ्या प्रमाणावर वापर झाल्यामुळे पळसाच्या पानाच्या पात्रवाळीची जागा या प्लास्टिक पात्रवाळीने घेतल्यामुळे हे चित्र दुर्लभ झाले आहे. तसेच प्लास्टिक हे पर्यावरणास हानिकारक आहे. गाव खेड्यातील लहान मुले घर घर खेळताना आज पळसाच्या पानाची पात्रवाळी करतानाचे हे दृश्य पाहुन मला गाव खेड्यातील ते जुने दृश्य आठवले.