शिरूर : महान्युज लाइव्ह
कोरोना महामारीत जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या शिरूरच्या पूर्व भागातील पत्रकारांचा वडगांव रासाईचे सरपंच सचिन शेलार यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
राज्यात गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संकट सुरू होते. या संकटकाळात शिरूर तालुक्यातील पूर्व भागातील पत्रकार हे घरात न थांबता नागरिकांना मदत देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत होते.या कामाची दखल घेत सरपंच सचिन शेलार यांच्या वतीने सन्मान सोहळ्याचे छत्रपती माध्यमिक विद्यालयात आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना भाजपचे तालुकाध्यक्ष आबासो सोनवणे म्हणाले की, शिरूर तालुक्यातील पूर्व भागातील पत्रकार हे नेहमीच सामाजिक भान ठेवून काम करत असतात. कोरोना काळात ते वेगळेपण जपलेच परंतु अनेकांना दिलासा देण्याचे काम केले हे कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी पंचायत समिती सदस्य लक्ष्मण फराटे बोलताना म्हणाले की,सामाजिक जडणघडणीत पत्रकारांचे मोलाचे योगदान असते. शिरूर पूर्व भागातील पत्रकार यांनी कोरोना काळात सर्व विसरून ईश्वरसेवेचे कार्य केले आहे.ही अभिमानाची गोष्ट असल्याचे गौरवोद्गार फराटे यांनी काढले.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे संस्थापक स्व. बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच सरस्वती पूजन करून करण्यात आले.यावेळी प्रास्ताविक एस. पी.काकडे यांनी केले तर सूत्रसंचालन एस.के बेल्हेकर यांनी केले.भाजपा सहकार आघाडीचे अध्यक्ष काका खळदकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.या प्रसंगी सरपंच सचिन शेलार यांच्या हस्ते संस्थेस सनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन भेट देण्यात आली.
यावेळी पत्रकार प्रा.प्रताप भोईटे,संजय गायकवाड, प्रा.दत्तात्रय कदम,राजेंद्र बहिरट, प्रा.विठ्ठल गवळी, प्रा.तुकाराम पठारे, प्रमोल कुसेकर, महान्युज लाईव्हचे सतीश केदारी आदींचा सन्मान करण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक एम. टी.दिवे,पोपट शेलार, संपत फराटे,बाळासाहेब फराटे, यांसह ग्रामस्थ ,विद्यार्थी व सर्व शिक्षक आवर्जून उपस्थित होते.