सासवड : महान्यूज लाईव्ह
पुरंदर तालुक्यातील सासवड वीर रस्त्यावर काल अवकाळी पावसाच्या वादळी वाऱ्याने मोठा अनर्थ घडला. पुरंदर तालुक्यातील परिंचे येथील पत्रकार गुणशेखर जाधव यांच्या नातीसह मुलगा व सून या अपघातात मृत्युमुखी पडले.
काल सायंकाळी रस्त्याच्या कडेला असलेले झाड अंगावर पडल्याने परिंचे येथील नव विवाहित जोडप्याचा मृत्यू झाला. तर एक सात वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाली होती. तिला उपचारासाठी पुण्याला पाठवण्यात आले. तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
याबाबत पोलिसानी दिलेली माहिती अशी की, २२ एप्रिल रोजी सायंकाळी पाउस व वादळ वारा सुरु झाला
. यावेळी रेनुकेश गुणशेखर जाधव व त्याची पत्नी सारिका रेनुकेश जाधव
हे दोघे रेणुकेश याची भाची ईश्वरी संदेश देशमुख
हिच्यासह सासवडहून परिंचेकडे मोटार सायकलवर जात होते.
त्याने जात असताना रस्ते शेजारील अर्धवट जळलेले वडाचे झाड या गाडीवर कोसळले आणि यात रेणू कॅश व सारिका या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर ईश्वरी देखील गंभीर जखमी झाली. उपचारापूर्वीच मुकेश व सारिका यांचा मृत्यू झाला होता तर ईश्वरी यावरील पुढील उपचारासाठी तिला पुण्याला पाठवण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान तिचा ही दुर्दैवी मृत्यू झाला.
रेणूकेश व सारिका यांचा अवघ्या साडेतीन महिन्यापूर्वीच विवाह झाला होता. त्यामुळे परिंचे गावासह पुरंदर तालुक्यात शोककळा पसरली. रेणुकेश हा परिंचे येथील पत्रकार गुनशेखर जाधव यांचा एकुलता एक मुलगा होता.