बारामती : महान्यूज लाईव्ह
पिंपरी चिंचवड वरून बदली झालेले पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी गोविंदबाग येथे भेट घेतली.
कृष्णप्रकाश हे आज सकाळी माळेगाव येथे आले होते. कृष्णप्रकाश यांची नुकतीच पिंपरी चिंचवड वरून बदली झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील बदली झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना बारा तासांच्या आत स्थगिती दिली आहे, मात्र पुणे जिल्ह्यातील बदल्यांना स्थगिती मिळाली नाही. अधिकाऱ्यांच्या बदल्या स्थगिती मिळालेली नाही.
याच पार्श्वभूमीवर कृष्णप्रकाश यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. पवार आणि कृष्णप्रकाश यांच्यातील चर्चा ही दहा ते बारा मिनिटे चालली. मात्र त्यानंतर बाहेर आलेल्या कृष्णप्रकाश यांनी माध्यमांना काहीही माहिती सांगण्यास नकार दिला.
महा विकास आघाडी सरकारमध्ये गृह खाते राष्ट्रवादीकडे असल्यामुळे कृष्णप्रकाश यांनी शरद पवार यांची भेट घेतली असल्याचे सांगितले जाते. दरम्यान या भेटीनंतर नेमके काय घडते याची उत्सुकता आहे.