नगर : महान्यूज लाईव्ह
राज्याचे जलसंधारण राज्यमंत्री शंकराव गडाख यांचे पीए राहुल राजळे यांच्यावर काही अज्ञात गुंडांनी जीवघेणा हल्ला केला. काल रात्री नेवासा तालुक्यातील घोडेगाव परिसरात हा गोळीबार झाला.
या घटनेचे कारण अद्याप समजले नसून राजळे यांना उपचारासाठी तातडीने नगर येथे हलविण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिसांनी तातडीने धाव घेऊन पाहणी केली. मात्र राज्यातील राज्यमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकावर गोळीबार झाल्याने नगर जिल्ह्यात खळबळ उडाली.