शिरूर : महान्यूज लाईव्ह
सविंदणे (ता.शिरूर) येथील बंडू बबुशा नरवडे (वय. ४५) या शेतकऱ्याचा गुरुवार दिनांक २१ रोजी विदयुत पंपाच्या स्टार्टर पेटीला शॉक लागुन दुर्देवी मृत्यू झाला आहे. बंडू हे आपल्या शेताला पाणी देण्यासाठी पाझर तलावाजवळील मोटार चालू करण्यासाठी गेले असता स्टार्टर पेटीला शॉक लागुन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनास्थळी टाकळी हाजी औटपोस्टचे पोलिस उपनिरीक्षक सुनिल उगले, विशाल पालवे , महावितरणचे कर्मचारी यांनी भेट दिली असून घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास करत आहे.
सविंदणे परीसरात
खांबावरील तारा जीर्ण झाल्या असून बऱ्याच ठिकाणी त्या लोंबत आहे
त. तसेच विद्युत रोहीत्रांच्या फ्युज बॉक्सची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे धोका पत्करून शेतकऱ्यांना फ्युज,डिओ टाकावा लागत आहे. त्यात सातत्याने होणाऱ्या विजेच्या लंपडावामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे
.