सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : इंदापूर नगरपालिकेजवळील शाळा क्रमांक 1 व 2 येथील योगवर्गामध्ये जयंती उत्सवाच्या निमित्ताने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, भगवान वर्धमान महावीर यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी पतंजलि योग समितीच्या वतीने संविधानाचे सामूहिक वाचन पतंजली योग समिती युवा भारत इंदापूर, ओम योगा परिवार इंदापूर यांचे वतीने भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार आणि दिपप्रज्वलनाने योगसाधनेस सुरवात करण्यात आली.
सामाजिक समतेसाठी आयुष्य भर लढा देणारे समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनाही यावेळी सर्व योगसाधकांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
सेवानिवृत्त शिक्षक राजेंद्र चव्हाण यांनी आपल्या मनोगतामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्र उभारणीतील योगदानाविषयी माहिती सांगितली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले आपल्या देशाला मिळालेली रत्नच आहेत, असे त्यांनी सांगितले.
यावेळी पतंजली योग समितीच्या वतीने योगवर्गामध्ये संविधानाचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी पतंजली योग समितीचे डॉ संजय शिंदे, सचिन पवार, शंकर काशीद, प्रकाश बलदोटा, तात्यासाहेब वाघमारे, किसान पवार, कृषी अधिकारी देविदास सारंगकार, बिभीषण खबाले, सुनील कांबळे, कृष्णा शिंदे, शिवाजी अवचर, पियुष बोरा, यांचेसह बहुसंख्येने योगसाधक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद झोळ यांनी केले तर आभार प्रदर्शन रवींद्र परबत यांनी केले.