पुणे : महान्यूज लाईव्ह
पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची बदली झाली असून आता मुंबईचे सुधार सेवाचे विशेष पोलीस महानिरीक्षक अंकुश शिंदे हे आता पिंपरी चिंचवड येथील पोलीस आयुक्तपद सांभाळणार आहेत.
कृष्ण प्रकाश यांची विशेष पोलीस महानिरीक्षक, व्हीआयपी सुरक्षा, मुंबई येथे बदली झाली आहे. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त म्हणून पावणेदोन वर्षात त्यांनी धडाकेबाज कामगिरी केली. अवैध धंद्यांना चाप लावला. बॅंकांच्या घोटाळेबाजांच्या मुसक्या आवळल्याने व्हाईट कॉलर गुन्हेगारांनीही त्यांचा धसका घेतला होता.
याखेरीज पु्ण्याच्या सह पोलीस आयुक्तपदी संदीप कर्णीक आले आहेत. सुरेश कुमार मेकला पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी आले आहेत. सुनील फुलारी हे पुण्याच्या मोटार परिवाहन विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षकपद सांभाळतील. प्रवीण आर. आर. हे पुणे येथील महाराष्ट्र गुप्तवार्ता अकादमीचे संचालकपदावर आले आहेत. संजय बावीस्कर हे पुणे येथील गु्न्हे अन्वेषण विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदावर बदलून आले आहेत.