शिक्षण

तालुक्यातील ५८ माध्यमिक शाळांना आमदार अनिल भोसले यांच्या निधीतून पुस्तके वाटप ! राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते वितरण !

किशोर भोईटे
सणसर : महान्यूज लाईव्ह

विधान परिषद आमदार अनिल भोसले यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून इंदापूर तालुक्यातील ५८ अनुदानित माध्यमिक शाळांना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ग्रंथालयीन पुस्तके वाटप कार्यक्रम संपन्न झाला. इंदापूर तालुका मुख्याध्यापक संघ व श्री छत्रपती हायस्कूल व ज्युनियर कॉलेज भवानीनगर यांचे संयुक्त विद्यमाने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पंचवीस हजार रुपये किमतीची पुस्तके वाटप करण्यात आली.

यावेळी पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका रेश्मा भोसले, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, उपाध्यक्ष अमोल पाटील, संचालक अॅड रणजित निंबाळकर, डॉ दिपक निंबाळकर, राजेंद्र गावडे, निवृत्ती सोनवणे, नारायण कोळेकर,अभयसिंह निंबाळकर,माजी संचालक भाऊसाहेब सपकळ, विक्रमसिंह निंबाळकर ,वसंत जगताप, संस्थेचे सचीव अशोक मोरे,पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ अध्यक्ष नंदकुमार सागर, सेकंडरी पतसंस्था उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे, सचिव प्रसाद गायकवाड, उपाध्यक्ष नागनाथ ठेंगल ,सचिव जगन्नाथ पाटील ,उपाध्यक्ष ज्ञानदेव काळे, सदस्य भिवाजी शिंदे, पद्माकर लावंड, बाळासाहेब गरगडे, मच्छिंद्र बनसुडे , प्राचार्य रमेश मचाले, अंबादास कवळे , राकेश शहा तसेच इंदापूर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, शिक्षक यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी छत्रपती मुलींचे हायस्कूलचे मुख्याध्यापक लक्ष्मण गिरीगोसावी, सणसर हायस्कूलचे मुख्याध्यापक सुनील सर्जे यांनी आयोजन केले.

tdadmin

Recent Posts

इंदापूरमध्ये घड्याळाचा प्रचार करण्यासाठी आणलेल्या महिलांना पैसे दिले नाहीत? पैशावरून राडा!

इंदापूर : महान्यूज लाईव्ह  महायुतीचा प्रचार करण्यासाठी आणलेल्या महिलांना पैसे दिले नाहीत, म्हणून महिलांनी इंदापूरात…

20 hours ago

मोदीसाहेब, तुमचा टेलीप्रॉम्टर तपासा… खरंच सांगा शेतकऱ्यांना दिलासा कोणी दिला?

बारामती : महान्यूज लाईव्ह गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक सभा वाढवल्या. या…

2 days ago