पुणे : महान्यूज लाईव्ह
पुणे वेधशाळेने २१ ते २३ एप्रिलपर्यंत महाराष्ट्रातील बऱ्याचश्या जिल्ह्यात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
पुणे जिल्ह्यासह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड या जिल्ह्यात २१ व २२ तारखेला वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यात जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
राज्यस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशात धुळीचे वादळ येण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकुण हवामानावर त्याचा मोठा परिणाम दिसून येत आहे.
वरीलप्रमाणे हवामान आणि पावसाची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी नियोजन करावे असा सल्ला देण्यात आला आहे.