औरंगाबाद : महान्यूज लाईव्ह
एका महिला किर्तनकारासोबत शारिरिक संबंध ठेवणे, त्याचे व्हिडिओ शुटींग करणे असे प्रकार करणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापुर तालुक्यातील प्रसिद्ध किर्तनकार बाळकृष्ण मोगल महाराजावर गुन्हा दाखल झाला असून त्याला अटकही करण्यात आहे. न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली.
मराठवाड्यात बाळकृष्ण मोगल महाराजांची ओळख एक प्रसिद्ध किर्तनकार अशी आहे. त्यांना मानणारे हजारो भक्त आहे. यु ट्युबवर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. या महाराजांचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. यामध्ये ते एका महिला किर्तनकारासोबत अश्लिल चाळे करताना दिसत आहेत. या महिला किर्तनकारदेखील सुप्रसिद्ध असून त्यांचाही मोठा भक्तपरिवार आहे.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर दोघांच्याही भक्तांना मोठा धक्का बसला. समाजामध्येही मोठा असंतोष निर्माण झाला. आपल्या किर्तनाच्या माध्यमातून लोकांना उपदेशाचे डोस पाजणारे हे आध्यात्मिक क्षेत्रातील संत. त्यांचे असे वर्तन समोर आल्याने मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त झाला.
यातील महिला किर्तनकाराने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मोगल महाराजांविरोधात छत्रपती शिवाजी महाराज सेनेचे ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज डोणगावकर यांनी शिल्लेगाव पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. शिल्लेगावचे पोलिस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांनी महाराजाला अटक करून गंगापूर येथील न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली.