पुणे : महान्यूज लाईव्ह
कालव्याच्या बाजूला सायकल खेळत असणाऱ्या दोन लहान भाऊ बहिणीचा कालव्यात पडून मृत्यू झाल्याची दुख:द घटना पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील सोरतापवाडी येथे घडली आहे.
सोरतापवाडी येथील जुन्या बेबी कालव्याजवळ जागृती दत्ता ढवळे आणि शिवराज दत्ता ढवळे हे अंदाजे सात आठ वर्षाचे बहीण भाऊ सायकल खेळत होते. ते पाण्यात नेमके कसे पडले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण पाण्यात पडल्यानंतर त्यांना काही काळाने बाहेर काढण्यात आले. दोघांनाही तातडीने उपचारासाठी नेण्यात आले. परंतू दोघांचाही मृत्यू झाला असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.
या घटनेने कुटुंबियांना मात्र मोठा धक्का बसला आहे.