इंदापूर : महान्यूज लाईव्ह
येत्या बुधवारी म्हणजे 20 एप्रिल रोजी भवानीनगर मध्ये स्वाभिमानीचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांची जाहीर सभा होणार आहे. ( The Swabhimani Shetkari Sanghatana is holding its first meeting at the NCP’s Balekilla after leaving the Mahavikas Aghadi.)
महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात पहिलीच सभा होत असून या सभेपासून राज्यव्यापी बळीराजा हुंकार यात्रा सुरू करणार आहेत.
बुधवारी संध्याकाळी सहा वाजता छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या छत्रपती पालखी मैदान तळावर ही सभा होणार आहे. उसाला एकरकमी एफ आर पी मिळाली पाहिजे, दुधाला हमीभाव मिळाला पाहिजे. भूमि अधिग्रहण कायद्यातील जाचक तरतुदी रद्द झाल्या पाहिजेत, शेतीला दहा तास दिवसा वीज मिळाली पाहिजे, अशा विविध मागण्या घेऊन ही बळीराजा हुंकार यात्रा महाराष्ट्रात जाणार आहे. त्याची सुरुवात भवानीनगर येथून होणार आहे.
अर्थात राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात राजू शेट्टी पहिल्यांदा ही सभा घेऊन सरकारलाच आव्हान देण्याच्या तयारीत आहेत अशीही चर्चा असून यात्रा सरकारपुढे नेमके काय आव्हान उभे करते याचीही उत्सुकता सर्वांना आहे.