महान्यूज लाईव्ह विशेष
१८ एप्रिल या दिवशी काय घडले ?
१३३६ – हरिहर आणि बुक्क यांनी विजयगरच्या हिंदू राज्याची स्थापना केली. हे एक मोठे साम्राज्य निर्माण झाले.
१७०३ – औरंगजेबाने सिंहगड ताब्यात घेतला. महाराष्ट्रातील अनेक किल्ले औरंगजेबाने घेतले, परंतू तो महाराष्ट्र जिंकू शकला नाही.
१७२० – शाहू छत्रपती यांनी पहिल्या बाजीराव पेशव्यांना पेशवेपदाची जबाबदारी दिली.
१७७४ – सवाई माधवराव पेशवा यांचा पुरंदर किल्ल्यावर जन्म झाला. त्यांच्या जन्मामुळे रघुनाथदादा पेशवे यांना पेशवेपदावरून दुर करण्यास बारभाईंना बळ मिळाले.
१८५३ – मुंबईहून ठाण्यापर्यंत नियमित रेल्वे सेवा सुरु झाली. एकुण ३४ किलोमीटर ही रेल्वे धावली. साहिब, सिंध आणि सुलतान या तीन वाफेच्या इंजिनाच्या साह्याने या गाडीला खेचले जात होते.
१८५८ – स्त्रीशिक्षण आणि विधवा विवाहाचे पुरस्कर्ते महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म झाला.
१८५९ – १८५७ च्या उठावातील नानासाहेब पेशवे यांचे सेनापती रामचंद्र उर्फ रघुनाथ पांडुरंग येवलेकर उर्फ तात्या टोपे यांना आजच्या दिवशी फासावर चढविण्यात आले. १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामात तात्यांचे मोठे योगदान होते. परंतू या लढ्यात पराभव झाल्यानंतर तात्या टोपे पकडले गेले.
याखेरीज आजच्या दिवशी हिंदी आणि मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री ललिता पवार यांचा जन्म झाला होता. तसेच अल्बर्ट आईनस्टाईन या प्रसिद्ध शास्त्रज्ञाचाही जन्म झाला होता. पुनम धिल्लन या अभिनेत्रीचाही याच दिवशी जन्म झाला होता.
आजचा दिवस जागतिक वारसा दिन म्हणून साजरा केला जातो.