माणिक पवार
भोर : महान्यूज लाईव्ह
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बालवडी, तालुका भोर येथे गटशिक्षण अधिकारी अश्विनी सोनवणे, केंद्रप्रमुख प्रभावती कोठावळे, मुख्याध्यापक भिमराव शिंदे यांचे मार्गदर्शनाने शाळापूर्व तयारी मेळावा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

मुख्याध्यापक भिमराव शिंदे, सहकारी शिक्षक महादेव बदक, आनंदा सावले, अंजना घोलप, मंगल घोलप, अंगणवाडी ताई वैशाली तुपे, लता भोसले यांचे संकल्पनेतून शाळापूर्व तयारी अभियानाअंतर्गत इयत्ता पहिलीत दाखल होणारी बालके यांची घोड्यावरून आणि बैलगाडीतून ढोल ताशाच्या गजरामध्ये गावातून मिरवणूक काढण्यात आली. शाळेत बालकांचे औक्षण करुन गुलाबपुष्प देऊन शालेय दरवाजातील रांगोळीवर पाय उमटवून शाळेतील पहिले पाऊल हा उपक्रम साजरा करण्यात आला.
शालेय आवारात मंडपामध्ये विविध टेबलावर असणाऱ्या शैक्षणिक साहित्यातून मुलांच्या बौद्धिक आणि शारीरिक विकासाची चाचपणी करुन मार्गदर्शन करण्यात आले. शाळापूर्व तयारी मेळाव्यासाठी विश्वनाथ किंद्रे यांनी घोडा मोफत उपलब्ध करुन दिला. दिपक किंद्रे यांनी बैलगाडी मोफत दिली. स्वराज्य ग्रुप आणि भैरवनाथ तरुण मंडळ बालवडी यांनी ढोल ताशांची व्यवस्था करुन भव्य मिरवणूकीचे आयोजन केले. उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे, पोलिस निरीक्षक संदिप फणसे, अॅडव्होकेट विकास किंद्रे, माजी सरपंच अतुल किंद्रे यांनी मेळाव्यास उपस्थित विद्यार्थी शिक्षक पालक यांना स्नेहभोजनाची व्यवस्था केली.
कार्यक्रमास सरपंच सुवर्णा किंद्रे, उपसरपंच मच्छिंद्र फणसे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष किंद्रे, विकास सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब फणसे, व्हाईस चेअरमन संतोष भोसले, पोलिस पाटील शरद किंद्रे, जिल्हा बॅंकेचे माजी विभागीय अधिकारी वसंत किंद्रे, अशोक शिंदे, भिकू शिंदे, विठ्ठल किंद्रे, रामचंद्र किंद्रे, नथू किंद्रे, शामराव किंद्रे, सदाशिव किंद्रे, लक्ष्मण किंद्रे, गोकुळ फणसे, अॅडव्होकेट प्रशांत फणसे, संजय किंद्रे, अजित गायकवाड, रमेश किंद्रे, जयवंत किंद्रे, तुषार गायकवाड विशाल किंद्रे नंदू किंद्रे, मंजुश्री किंद्रे, वैशाली किंद्रे तसेच तरुण मंडळ,महिला मंडळ, ग्रामस्थ मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.