माणिक पवार
भोर : महान्यूज लाईव्ह
भोर तालुक्यातील केळवड येथील शिवसेना सहसंपर्कप्रमुख व माजी जिल्हा परिषद सदस्य कुलदीप कोंडे यांच्या मातोश्री सुशीलाताई सुदाम कोंडे यांचे वयाच्या ६८ वर्षी दि. १६ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. सुशीलाताई या अतिशय मनमिळावू, मितभाषी स्वभावाने परिचित होत्या. त्यांच्या अकस्मात निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.
सुशीलाताई यांच्या मागे पती सुदाम कोंडे, दोन विवाहीत मुले, एक विवाहित मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार असून शिवसेनेच्या विद्यमान जिल्हा परिषद सदस्या शलाकाताई कोंडे या त्यांच्या सुनबाई होत. केळवडे येथील स्मशानभुमीत सांयकाळी त्यांच्यावर मोठ्या शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भोर तालुक्यासह जिल्ह्यातील राजकीय समाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती राहून त्यांना श्रध्दांजली वाहिली असून दि. २२ एप्रिल रोजी राहत्या घरी दशक्रिया विधी होणार आहे.