मुंबई : महान्यूज लाईव्ह
महाराष्ट्र, बंगाल, बिहार आणि छत्तीसगड येथे झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांचे आज निकाल जाहीर झाले. एकुण ४ विधानसभा आणि १ लोकसभेसाठी झालेल्या या निवडणुकीत भाजपाच्या हाती एकही जागा लागलेली नाही.
महाराष्ट्रातील कोल्हापूर उत्तरच्या निवडणूकीत कॉंग्रेसच्या जयश्री जाधवांनी भाजपाच्या सत्यजित कदम यांच्यावर मात करत ही जागा कॉंग्रेसच्याचा ताब्यात ठेवली आहे. यापुर्वी जयश्री पाटील यांचे पती येथील कॉंग्रेसचे आमदार होते. त्यांच्या निधनामुळे झालेल्या या पोटनिवडणूकीत त्यांच्या पत्नी जयश्री जाधव या कॉंग्रेसच्या उमेदवार होत्या.
बंगालमध्ये लोकसभेच्या जागेवर तृणमूल कॉंग्रेसचे उमेदवार अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपाच्या उमेदवार अग्निमित्रा यांचा ३ लाखाच्या फरकाने पराभव केला आहे. बंगालमधील बालीगंगे विधानसभा निवडणूकीत तृणमूल कॉंग्रेसचे बाबुल सुप्रियो हे निवडून आले आहेत. या विधानसभा निवडणूकीत भाजपा चौथ्या क्रमांकावर राहिली आहे.
बिहारमध्ये बोचहेन विधानसभेच्या पोटनिवडणूकीत राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार अमर कुमार पासवान यांनी भाजपाच्या बेबी कुमारी यांना हरवले.
छत्तीसगड येथील खैरागड विधानसभा पोटनिवडणूकीतही कॉंग्रेसचा उमेदवार आघाडीवर आहे.
बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेस, बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल, छत्तीसगड आणि महाराष्ट्रात कॉंग्रेसने विजय मिळवला आहे.
बंगाल