कोल्हापूर : महान्यूज लाईव्ह
राज्यातील अत्यंत चुरशीच्या झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील लढतीत सतराव्या फेरीअखेर महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव या 13 हजार मतांनी आघाडीवर आहेत.

महाविकास आघाडी आणि भाजपने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीदरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपचा उमेदवार पराभूत झाला तर मी हिमालयात जाईल अशा प्रकारची घोषणा केली होती. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी या ठिकाणी मतदारसंघ पिंजून काढला होता.
ही निवडणूक भाजप आणि काँग्रेस अशी होण्याऐवजी भाजप विरुद्ध शिवसेना अशी अधिक रंगली होती.
आता मतमोजणी सुरू असून सतराव्या फेरीअखेर काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना 64584 मते तर भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांना 51 हजार 688 मते मिळाली आहेत. जयश्री जाधव या 13 हजार मतांनी आघाडीवर आहेत.