मुंबई : महान्यूज लाईव्ह
पंजाब सरकारने १ जुलैपासून राज्यातील सर्व कुटुंबाना ३०० युनीटपर्यंत मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे. पंजाबमधील आम आदमी पार्टीच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभुमीवर ही घोषणा करण्यात आली आहे.
सध्या पंजाबमध्ये शेतकऱ्यांना तसेच अनुसुचित जातीच्या कुटुंबाना मोफत वीज पुरवली जाते. आता पंजाबमध्ये कापणीचा हंगाम सुरु असून या काळात ग्रामीण भागात वीजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळेच मान सरकारने हा हंगाम संपल्यानंतर १ जुलैपासून मोफत वीज योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.