मुंबई : महान्यूज लाईव्ह
‘ तिसरे महायुद्ध सुरु झाले आहे.’ अशी घोषणा रशियाच्या सरकारी टिव्ही चॅनेलवरून करण्यात आली आहे. बाल्टिक समुद्रात रशियाची युद्धनौका बुडाल्यानंतर ही प्रतिक्रिया आली आहे. रशिया युक्रेन युद्धाला आता ५० दिवस होऊन गेले आहेत, आता हे युद्ध थांबण्याऐवजी आणखी तीव्र होण्याची शक्यता दिसते आहे.
आता या युद्धात केवळ युक्रेन नसुन नाटोदेखील उतरली असल्याचे या युद्धनौकेवरील हल्ल्यावरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे आता हे युद्ध नाटो संघटना आणि रशिया यांच्यात सुरु असल्याने तिसरे महायुद्ध सुरु झाल्याचे या टिव्हीवरून सांगितले गेले आहे.
या युद्धनौकाचे त्यावरील स्फोटकामुळे लागलेल्या आगीमुळे गंभार नुकसान झाल्याचे यापूर्वी रशियाने म्हणले होते, तर युक्रेनने आपल्या हल्ल्यामुळेच या युद्धनौकेचे नुकसान झाल्याचे म्हणले होते. आता रशियन टिव्हीवरून झालेल्या या घोषणेमुळे रशियादेखील या युद्धनौकेचे नुकसान मिसाईल हल्ल्यामुळे झाले असल्याचे मान्य करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
याचबरोबर रशियाने अनेक दिवसानंतर किव्ह या युक्रेनच्या राजधानीवर पुन्हा हल्ले चढविले आहे. आता या युद्धाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे.