दौंड : महान्युज लाईव्ह
जिल्हा ग्रामीण पोलीस दलात अभिमान वाटावा अशी कामगिरी दौंड व यवत पोलिसांनी केली आहे. यवत पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्यासह दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात केले आहे.

यवत पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दौंड तालुक्यातील राहू येथे ४ मार्च रोजी सात गावठी पिस्तूल व २४ जिवंत काडतुसे जप्त करून सहा आरोपींना अटक करून कारवाई केली होती. या कारवाईनंतर इतर जिल्ह्यातुन बेकायदा गावठी पिस्तूलची टोळी जेरबंद करण्याची कामगिरी केली होती. या कामगिरीची दखल खुद्द जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी घेतली.
शुक्रवारी ( दि.१४ ) पुणे येथील भीमाशंकर सांस्कृतिक हॉल पुणे येथे पार पडलेल्या मासिक गुन्हे आढावा बैठकीत पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांच्या हस्ते जिल्ह्यात अतिशय चांगली कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यवत पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार, गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार निलेश कदम व गुरुनाथ गायकवाड यांना पुणे ग्रामीण जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट मालमत्ता हस्तगत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यापुर्वीही उत्कृष्ट कामगिरी बद्दल पोलीस निरीक्षक नारायण पवार आणि दौंड पोलीस निरीक्षक विनोद घुगे तसेच पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला होता.आता पुन्हा एकदा जिल्ह्यात यवत पोलीस निरीक्षक नारायण पवार आणि पोलीस कर्मचारी यांचा चांगल्या कामगिरीसाठी सन्मान करण्यात आल्याने त्यांचे कौतुक केले जात आहे.