बारामती : महान्यूज लाईव्ह
मेडिकोज् गिल्ड बारामती या वैद्यकीय व्यवसायिकांच्या संस्थेच्या अध्यक्षपदी डॉक्टर विभावरी सोळुंके यांची तर सचिवपदी डॉक्टर चंद्रकांत पिल्ले यांची निवड करण्यात आली यावेळी संघटनेची 2022-23 या वर्षाची कार्यकारणी देखील जाहीर करण्यात आली.
सर्व पॅथींच्या डॉक्टरांची प्रतिनिधित्व करणारी ही एकमेव संस्था असून अलोपॅथी, आयुर्वेद व होमिओपॅथी अशा विविध पॅथींचे डॉक्टर या संस्थेचे सदस्य आहेत.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर संस्थेचे मावळते अध्यक्ष डॉ. संजय पुरंदरे यांनी नूतन अध्यक्षा डॉ. विभावरी सोळुंके यांच्याकडे २०२२-२३ या वर्षासाठी मेडिकोज् गिल्ड ची सूत्रे सुपूर्त केली.
मेडिकोज् गिल्ड ची २०२२-२३ ची नवीन कार्यकारीणी खालील प्रमाणे : डॉ अशोक तांबे, डॉ राजेंद्र चोपडे, डॉ सुहासिनी सोनवले, डॉ संजय पुरंदरे, डॉ प्रशांत माने, डॉ नीती महाडिक, डॉ सोनिया शाह, डॉ दिनेश ओसवाल, डॉ चंद्रशेखर धुमाळ, डॉ शशांक जळक, डॉ सौरभ मुथा, डॉ संदेश बोबडे, डॉ अमोल भंडारे, डॉ संताजी शेळके, डॉ संदीप बर्गे, डॉ शुभांगी वाघमोडे, सौ स्नेहल आटोळे, डॉ प्रितम ललगुनकर, डॉ सचिन घोळवे, डॉ प्रियांका मुथा, सौ रेश्मा ओसवाल, सौ अनिता धोपाडे, डॉ नेत्र सिकची, डॉ मनीषा शेळके, डॉ स्मिता बोके, डॉ सुप्रिया गदादे, डॉ मिनाक्षी देवकाते, डॉ शीतल मेहता, सौ रंजना तांबे, सौ निर्मला भोईटे,
सौ संगीता दोषी, सौ गीता व्होरा, सौ दिपा शाह, डॉ वैशाली पिल्ले, डॉ दीपाली टेंगले, डॉ स्मिता बोराडे, डॉ वर्षा सिद्धये, डॉ रेवती संत, डॉ वर्षा कोकणे, डॉ दिलीप लोंढे, डॉ बी एन आटोळे, डॉ आशिष जळक, डॉ अंजली खाडे, डॉ दिपा भंडारे, डॉ सई सातव, डॉ वृषाली हरके, डॉ नानासाहेब देवकाते, डॉ एम आर दोषी, डॉ मोहन पाटील, डॉ सरोजिनी खोमणे, डॉ आर.पी. राजे, डॉ आर आर भोईटे, डॉ जे जे शाह, डॉ आर एम शाह, डॉ प्रीतम व्होरा, सौ संध्या बोबडे, डॉ राहुल संत, डॉ तुषार गदादे.
सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक, कौटुंबिक कार्यक्रमांबरोबरच पारंपरिक सण साजरे करून नवीन पिढीला भारतीय संस्कृती व परंपरेची ओळख करून देण्याचं कामही मेडिकोज् गिल्ड कडून करण्यात येते अशी माहिती सचिव डॉ चंद्रकांत पिल्ले यांनी दिली.