दौंड, महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील हातवळण येथे यात्रेच्या या पार्श्वभूमीवर बेकायदा देशी-विदेशी दारूची खुलेआम सुरू असलेल्या विक्री अड्ड्यावर पाटस पोलीसांनी छापा टाकून कारवाई केली आहे. सहा हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन एकास अटक केली आहे,अशी माहिती पाटस पोलिस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांनी दिली यांनी दिली.
याप्रकरणी योगेश रत्नाकर कदम ( वय ३०, राहणार हातवळण,तालुका दौंड जिल्हा पुणे ) यास अटक केली आहे. हातवळण येथील यात्रेच्या पार्श्वभूमीवर व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी गुरुवारी ( दि.१४ ) रात्री पाटस पोलीसांनी ही कारवाई केली आहे. हातवळण येथील ग्रामदैवतची यात्रा बुधवारी व गुरुवारी दोन दिवस होती.
या यात्रेच्या पार्श्वभूमीवर देशी दारूची खुलेआम विक्री सुरू असल्याची माहिती पाटस पोलिसांना मिळाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे, पोलीस हवालदार संदीप कदम, पोलीस नाईक घनशाम चव्हाण,पोलीस शिपाई समीर भालेराव, हनुमंत खटके, गणेश मुटेकर, प्रविण चौधर आदींनी छापा टाकला असता एका खासगी वाहनांमध्ये देशी-विदेशी दारूची खुलेआम विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांनी ६ हजार किंमतीचा बेकायदा देशी विदेशी दारू साठा जप्त करून एकास ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलीस हवालदार संदीप कदम यांनी फिर्याद दिल्याने संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.