अनिल गवळी
पुणे : महान्यूज लाईव्ह
तु इथला भाई बनतोस का, असे विचारत हडपसरच्या काळेपडळ भागात सनी उर्फ गिरीष हिवाळे आणि त्याच्या मित्राला मारहाण करण्यात आली. या मारहाणीत सनीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

सनी उर्फ गिरीश हिवाळे ( वय २४ ) आणि त्याचा मित्र परवेज उर्फ सोहेल हैदरअली इनामदार ( वय २० ) हे दोघेजण नुकतेच जेलमधून सुटले होते. त्यांना भेटण्यासाठी, त्यांचे मित्र हे काळेपडळ येथे सारखे येत होते.
या कारणावरून तसेच जुन्या भांडणावरून कारणावरून “काळेपडळ मधील भाई होताय का तुम्हाला सोडणार नाही” असे म्हणुन आठ जणांनी या दोघांना कोयता, पालघन, लाकडी दांडके व दगडाने मारहाण केली. यामध्ये सनी उर्फ गिरीश हा मरण पावला तर परवेझ गंभीर जखमी झाला.
याबद्दल एकूण आठ जनाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सगळे आरोपी फरार आहेत.