पुणे : महान्यूज लाईव्ह
पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकचा अवयव प्रत्यारोपण केंद्राचा परवाना आरोग्य खात्याने तात्पूरता रद्द केला आहे. रुबी हॉल क्लिनिकमध्ये झालेल्या एका किडणी प्रत्यारोपणामध्ये कागदपत्रावर असलेली किडणीदाती व प्रत्यक्षातील किडणीदाती यांच्यात फरक आढळला. त्याखेरीज किडणी देणाऱ्या महिलेने आपल्याला किडणी देण्यासाठी १५ लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले असल्याचे आणि शस्रक्रिया झाल्यानंतर एकही रुपया दिला नसल्याची तक्रार केली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर रुबी हॉल क्विनिकचा सर्व प्रकारच्या अवयव प्रत्यारोपणाचा परवाना तात्पुरता रद्द करण्यात आला आहे.
संबंधित किडणी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया २४ मार्च रोजी पार पडली. अमित साळुंखे यांना कागदपत्राप्रमाणे त्यांची पत्नी सुजाता साळुंखे या किडणी देणार होत्या. परंतू प्रत्यक्षात त्यांच्या जागी दुसऱ्याच स्त्रीला त्यांची पत्नी म्हणून आणण्यात आले. संबंधित स्त्रीची किडणी अमीत साळुंखे यांना देण्यात आली. ज्यावेळी शस्त्रक्रियेनंतर किडणीदात्याला रुग्णालयातून सोडण्याची वेळ आली, त्यावेळी तिने आपण अमित साळुंखे यांची पत्नी नसल्याचा खुलासा केला. आपल्याला किडणी देण्यासाठी १५ लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले गेले होते आणि ती रक्कमही दिली गेली नसल्याचाही आरोप तिने केला.
रुबी हॉल क्लिनिकने याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानूसार सर्व प्रक्रिया शासनाने निर्धारित केलेल्या समितीच्या देखरेखीखाली करण्यात आली होती. त्यामुळे आपल्यावरील ही कारवाई अन्यायकारक असल्याचे रुबी हॉल प्रशासनाचे म्हणणे आहे.