मुंबई : महान्यूज लाईव्ह
सुख मिळविण्याची लालसा माणसाला काय करायला लावेल याचा काही नेम नसतो. विकृत पद्धतीने लैंगिक सुख मिळविण्याचा प्रयत्न ब्राझिलच्या एका ५४ वर्षाच्या व्यक्तीच्या चांगलाच अंगाशी आला.
पोटदुखीची तक्रार घेऊन आलेल्या या रुग्णाचा एक्स रे पाहून डॉक्टर हादरले. त्याच्या गुप्तांगात २० सेमी लांबीचे आणि २ किलो वजनाचे डंबेल अडकले होते. अधिक चौकशी करता या व्यक्तीनेच स्वत: हे डंबेल आपल्या शरिरात घुसवले होते. लैंगिक सुख मिळविण्याच्या नादात त्याने हा प्रकार केला होता. त्यानंतर त्याने स्वत: ते डंबेल बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, परंतू त्यात त्याला यश आले नाही.
अखेर असह्य वेदनांनी तळमळत त्याने रुग्णालय गाठले. डॉक्टरांच्या पथकाने अखेर ते डंबेल बाहेर काढले. त्यानंतरही त्याला तीन दिवस रुग्णालयात काढावे लागले आहेत.