खंडाळा : महान्यूज लाईव्ह
साताऱ्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने पोलिस रेकॉर्डवरील आरोपी कडून देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस असा 65 हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ( The local crime branch of Satara has seized Rs 65,200 worth of home-made pistols and live cartridges from the accused on police records.)
यासंदर्भात पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोराडे यांनी सातारा जिल्ह्यातील बेकायदेशीर शस्त्र संदर्भात कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांना दिल्या होत्या. त्यानुसार श्री किशोर कुमार यांनी आपले पथक तैनात करून माहिती घेण्यास सुरुवात केली.
तेव्हा त्यांना बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांच्या रेकॉर्डवरील एक आरोपी हा कराड शहरातील भाजी मंडई परिसरामध्ये येणार असून त्याच्या जवळ देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच किशोर धुमाळ यांनी तपास पथकाचा सापळा भाजी मंडई येथे लावला. तेव्हा 12 एप्रिल 022 रोजी दुपारी बारा वाजून 15 मिनिटांनी सांगितलेल्या माहितीतील आरोपी गौरव सुरेश बनसोडे (वय 22 वर्ष, रा. मलकापूर तालुका कराड जिल्हा सातारा) हा भाजी मंडई मधील हॉटेल हयात या हॉटेलच्या बाजूला उभा असलेला दिसला.
त्यास पथकाने ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली, तेव्हा त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतुस असा 65 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. त्यावरून त्याच्याविरुद्ध अग्निशस्त्र कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोराडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सहाय्यक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे, फौजदार मदन फाळके, यु.सी. दबडे, तानाजी माने, संजय शिर्के, विजय कांबळे, संतोष पवार, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, साबीर मुल्ला, मंगेश महाडिक, नितीन गावले, प्रवीण फडतरे, निलेश काटकर, अमोल माने, स्वप्निल माने, मुनीर मुल्ला, अजित करणे, शिवाजी भिसे, दिपाली यादव, यशोमती साळुंखे, पृथ्वीराज जाधव, मयूर देशमुख, मोहसीन मोमीन, रोहित निकम, प्रवीण पवार, संकेत निकम, गणेश कचरे, संभाजी साळुंखे, सुशांत घाडगे यांनी ही कारवाई केली.