मुंबई : महान्यूज लाईव्ह
पॉर्न किंवा अश्लिल व्हिडिओ पाहत बसणे हे काही चांगल्या मनोवृत्तीच्या माणसाचे लक्षण नाही. पण आज जगभर असे व्हिडिओ पाहणाऱ्याचे प्रमाण प्रचंड आहे. भारतातही कोट्यावधी लोक पॉर्न व्हिडिओ पाहतात. आपल्या आसपासच्या लोकांचे मोबाईल नीट तपासले तर त्यातही आपल्याला अपेक्षित नसलेले लोकदेखील असे व्हिडिओ पाहत असल्याचे आढळून येईल. पंरतू हे व्हिडिओ चोरुन मारून कुणाला न कळता पाहिले जातात.
परंतू आता एका कंपनीने चक्क असे पॉर्न व्हिडिओ पाहण्याची नोकरीच ऑफर केली आहे. आणि विशेष म्हणजे केवळ दोन दिवसात ३१ हजार लोकांनी या नोकरीसाठी अर्ज केले आहेत.
bedbible असे या कंपनीचे नाव असून ही कंपनी लैंगिक खेळण्याची विक्री करते. या कंपनीने पॉर्न व्हिडिओ पाहण्यासाठी लोकांकडून अर्ज मागवले आहेत. या नोकरीसाठी पात्र ठरणारांना पॉर्न व्हिडिओचे परीक्षण करावे लागणार आहे. यामध्ये व्हिडिओचा कालावधी, स्त्री पुरुषांचा सहभाग, भाषा या सर्वांचा डेटा एकत्र करून कंपनीला रिपोर्ट तयार करून द्यायचा आहे. कंपनी संबंधित व्यक्तीच्या सासत्याने संपर्कात राहणार आहे.
ही नोकरी तुम्ही जगाच्या पाठीवर कुठुनही करू शकता. या कामासाठी तुम्हाला एका तासाला अंदाजे १५०० रुपये दिले जाणार आहेत. २१ वर्षाच्या वर वय असणे ही या नोकरीची प्राथमिक अट आहे.
पॉर्न व्हिडिओ हा जगातील प्रचंड मोठा व्यवसाय आहे. या परिक्षणातून अनेक नव्या गोष्टी समोर येण्याची अपेक्षा आहे, असे कंपनीच्या हेड कॉन्टेंट क्रिएटर यांनी दिली.