सुरेश मिसाळ
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सतत पाठपुरावा करून निधी आणण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्र शासनाने ग्रामविकास विभागाकडून २५ – १५ योजनेअंतर्गत विकास कामांसाठी ५ कोटीचा निधी मंजूर झाला असून जिल्हा परिषद स्थानिक विकास निधी मधून १ कोटी २८ लाख इतका निधी मंजूर झालेला आहे,अशी माहिती सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
इंदापूर तालुक्यातील रस्ते , गटार, वर्ग खोल्या इमारत, चौक सुशोभीकरण, इत्यादी कामे मंजूर करण्यात आले आहेत.
मंजूर झालेली कामे पुढील प्रमाणे..
१.रुई बाबीर देवस्थान मंदिर सुशोभीकरण करणे संरक्षण भिंत बांधणे सभामंडप बांधणे — रक्कम ७५ लाख
२.निमगाव केतकी हनुमान तालीम व्यायाम शाळा इमारत बांधणी — रक्कम २० लाख
३. कळाशी काळभैरवनाथ विद्यालयाची इमारत बांधणे –रक्कम २५ लाख
४. शेळगाव मुस्लीम दफनभूमी संरक्षक भिंत बांधणे – रक्कम १५ लाख.
५. लाखेवाडी जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळ वर्गखोल्या बांधणे — रक्कम २५ लाख.
६. वकीलवस्ती येथील मुस्लीम ईदगाह रस्ता करणे– रक्कम १० लाख
७. वकीलवस्ती सुरेश मोरे वस्ती येथे मारुती मंदिर पेविंग ब्लॉक बसविणे — रक्कम १० लाख
८. गलांडवाडी नं 1 गुरुकुल हायस्कूल समोरील रस्ता करणे–१० लाख
९. अजोती येथे व्यायाम शाळा इमारत बांधणी –८ लाख
१०. वालचंदनगर -कळंब येथील राजदत्त उबाळे अनु जाती केंद्रीय प्राथमिक निवासी शाळा इमारत बांधणे — रक्कम २० लाख
११. वडापुरी मुस्लिम समाजासाठी दफनभूमी संरक्षक भिंत बांधणे– रक्कम २० लाख
१२. काझड अंतर्गत नाना सखाराम नरुटे वस्ती ते काझड सणसर रस्ता करणे — रक्कम १५ लाख
१३. माळवाडी नंबर२ कवितके वस्ती ते गाढवे वस्ती रस्ता करणे — रक्कम १० लाख
१४. माळवाडी नंबर २ मोरे वस्ती शाळा ते जगताप वस्ती रस्ता करणे — रक्कम १० लाख
१५. भाटनिमगाव शेख फरीद बाबा दर्गा मज्जित परिसरात बांधकाम करणे — रक्कम २० लाख
१६. निमगाव केतकी बाजारपेठ सुशोभिकरण करणे — रक्कम १५ लाख
१७ . लासुर्णे येथील वैदवाडी नंबर २ वरचीवाडी जय भवानी माता मंदिर सभागृह बांधणे — रक्कम ७ लाख
१८. पिटकेश्वर रामोशी जाधव वस्ती सामाजिक सभागृह बांधणे
— रक्कम ५ लाख
१९.अंथुर्णे जैन मंदिर सामाजिक सभागृह बांधणे — रक्कम १२ लाख
२०. व्याहळी भैरवनाथ मंदिर परिसरात सामाजिक सभाग्रह बांधणे — रक्कम २० लाख
२१. कळाशी मुस्लिम समाज मंदिर बांधकाम करणे — रक्कम १० लाख
२२. अंथुर्णे शरद नगर येथे सभामंडप बांधणे — रक्कम ५ लाख
२३. भरणेवाडी येथील बिरोबा मंदिर येथे पेविंग ब्लॉक बसविणे — रक्कम १० लाख
२४. भरणेवाडी येथील बिरोबा मंदिर परिसरात रस्ता काँक्रीटीकरण करणे — रक्कम २५ लाख
२५.अंथुर्णे येथील वाघवस्ती येथे रस्ता करणे — रक्कम २० लाख
२५. निमसाखर महादेव मंदिर परिसर सुशोभीकरण करणे — रक्कम १० लाख
२६. निमसाखर बर्गे वस्ती रस्ता करणे — रक्कम १५ लाख
२७. गोतोंडी यादव वस्ती रस्ता करणे — रक्कम १५ लाख
२८. तक्रारवाडी जीप शाळा ते अविनाश धुमाळ रस्ता करणे — रक्कम १० लाख
२९. तक्रारवाडी मारुती मंदिर सुशोभीकरण करणे — रक्कम 10 लाख
३०. डाळज नं १ पोस्ट ऑफिस ते राजेंद्र पवार रस्ता करणे –रक्कम १० लाख
३१. डाळज नं 3 येथील हनुमंत जाधव घर ते स्मशानभूमी रस्ता करणे — रक्कम ८ लाख
३२. पिंपरी बुद्रुक शिवस्मारक सुशोभीकरण करणे — रक्कम ४ लाख
३३. पिंपरी बु स्मशानभूमी सुधारणा करणे — रक्कम ३ लाख
34)पिंपरी बु स्मशानभूमी संरक्षण भिंत करणे — रक्कम 3 लाख
३५. हिंगणगाव लक्ष्मी आई मंदिर परिसरात सुधारणा करणे
— रक्कम ५ लाख
३६.अकोले गणपती मंदिर तक्षीमदार रस्ता करणे
— रक्कम ५ लाख
३७. डाळ ज नं १ खैरे आळी ते गणेश मंदिर रस्ता करणे– रक्कम ५ लाख
३८. शेटफळ हवेली बावडा रोड ते भोंगळे वस्ती रस्ता करणे– रक्कम १० लाख
३९.शेळगाव महादेव नगर नारायण खराडे घर रस्ता करणे
— रक्कम २५ लाख
४०. जाचक वस्ती पार्लेकर वस्ती रस्ता करणे
— रक्कम १० लाख
41)जाचक वस्ती शेखवस्ती बंदीस्त गटर करणे — १० लाख
42)गिरवी मारुती मंदिर सभामंडप बांधणे
— रक्कम 10 लाख
४३. सणसर डॉ दीपक निंबाळकर घर ते गाडेकर चौक रस्ता
— रक्कम३ लाख
४४. पंधार वाडी ग्रामपंचाय कार्यालय दुरुस्ती करणे
— रक्कम २ लाख
४५. शहा छगन खबालेवस्ती ते नितीन शेंडगे वस्ती रस्ता करणे — रक्कम ३ लाख
४६. मदनवाडी अहिल्या सृष्टी सुशोभीकरण मदनवाडी चौक
— रक्कम ५ लाख
४७.अवसरी ज्योतिबा मंदिर सभामंडप — रक्कम ५ लाख
४८. कळस गुंजाळ वस्ती रस्ता करणे — रक्कम ५ लाख
४९. डाळज नंबर 2 श्री विठ्ठल रुक्मिणी सभामंडप — रक्कम ५ लाख
५०. बोरी जगताप वस्ती प्रा शाळा पेव्हिंग ब्लॉक बसविणे– रक्कम २.५० लाख
५१ .बोरी भिसे वस्ती प्रा शाळा पेव्हिंग ब्लॉक बसविणे– रक्कम २.५० लाख
५२ .गोखळी जिप शाळा ते संजय डोंबळे रस्ता करणे — रक्कम ५ लाख