कोल्हापूर : महान्यूज लाईव्ह
माणुस स्वत:ला जगातील सर्वात बुद्धिमान प्राणी मानतो. पण त्याची करणी पाहून तो जगातील सर्वात विकृत प्राणी मानला गेला पाहिजे असे वाटते. अगदी लहान लहान मुलींवर बलात्कार करणारा विकृत मनोवृत्तीच्या माणसांच्या बातम्या आपल्या वाचनात येतात. पण काही माणसे त्यापेक्षाही विकृतीचा कळस गाठतात. अशाच एका घाणेरड्या प्रवृत्तीच्या माणसाने जंगलातील घोरपडीबरोबर अनैसर्गिक संभोग केल्याचा व्हिडिओ ज्यावेळी वन अधिकाऱ्यांच्या हाती लागला, त्यावेळी त्यांनाही यावर आता काय कारवाई करावी हेदेखील कळेनासे झाले.
सह्याद्री व्याघ्र वन प्रकल्पातील गोठणे येथील गाभा क्षेत्रात शस्त्रात्रांसह फिरणारे तीन जण ट्रॅप कॅमेऱ्यात आढळून आले. हे ट्रॅप कॅमेरे वाघांची माहिती मिळविण्यासाठी लागले होते. तीन शिकारी त्यात दिसताच वनअधिकाऱ्यांनी यातील दोन आरोपींना संगमेश्वर तालुक्यातून तर एकाला हातीव गावातून ताब्यात घेतले. या शिकाऱ्यांकडून दोन बंदूका तसेच दोन दुचाकीही वनाधिकाऱ्यांनी जप्त केल्या.
या आरोपींचे मोबाईल तपासल्यानंतर यातील एका आरोपीने चक्क घोरपडीबरोबर संभोग केल्याचे रेकॉर्डींग वनाधिकाऱ्यांच्या हाती लागले. हे पाहून वनाधिकाऱ्यांनाही धक्का बसला. वनप्राण्यांसोबत संभोग करणे ही फारच विचित्र घटना आहे. त्यामुळे याबाबतची केस उभी करताना यातील कायदेशीर बाजू न्यायालयासमोर मांडल्या जातील.
या शिकाऱ्यांनी ससा, पॅंगोलिन, साळिंदर पिसुरी हरिण यांचीही शिकार केल्याचे त्यांच्या मोबाईवमधील फोटोंवरून वनाधिकाऱ्यांना आढळले आहे. आता या सगळ्याबाबत गुन्हेगारांवर खटला चालविण्यासाठी वनखाते प्रयत्नशील आहे. घोरपडीसारख्या जंगली प्राण्यासोबत संभोग करणाऱ्या व्यक्तीस मानसोपचार तज्ञांच्या हवाली करण्याच्या विचारात वनविभाग आहे.