• Contact us
  • About us
Saturday, May 21, 2022
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आपली गुढी भगव्या पताक्याचीच का?

Maha News Live by Maha News Live
April 2, 2022
in सामाजिक, सुरक्षा, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राष्ट्रीय, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0

डॉ.श्रीमंत कोकाटे, इतिहास अभ्यासक

गुढीपाडव्याचे उल्लेख संतसाहित्यात आहेत, परंतु आजची जी ‘साड़ी-चोळी-बांबू-आणि पालथा तांब्या’ या स्वरूपाच्या गुधीचा उल्लेख कोणत्याही साहित्यात नाही. गुढीपाडवा हा जर हिंदूचा सण असेल तर मग महाराष्ट्राबाहेर गुढ्या का उभारल्या जात नाहीत?. महाराष्ट्राबाहेर हिंदू राहत नाहीत काय? आजच्या स्वरूपातील गुढ्या महाराष्ट्रातच का?, तर आजची गुढी हे सनातनी पुरूषसत्ताक स्त्रीदास्य गुलामगिरीचे प्रतिक आहे.

छत्रपती संभाजीराजे शूर, पराक्रमी, स्वाभिमानी, सुंदर आणि बुद्धिमान होते. असे समकालीन ऍबे करे म्हणतात. ते सनातन्यांच्या इशाऱ्यावर चालणारे नव्हते. त्यांनी बुधभूषण, नखशिख, नायिकाभेद आणि सातसतक हे चार ग्रंथ लिहिले. त्यापैकी बुधभूषण हा संस्कृत तर इतर हिंदी ग्रंथ आहेत. “पण भांडारकरी भटांनी मूळ बुधभूषन नष्ट करून ब्राह्मणी चोपडे समोर आणले आहे.” असे शरद पाटील नावाचे जागतिक कीर्तीचे प्राच्यविद्यापंडित म्हणतात. संभाजीराजांच्या विद्वतेचा, चांगुलपणाचा आणि शौर्याचा मंत्री पदोपदी द्वेष करत होते. त्यांनी  संभाजीराजांना ठार मारण्याचा तीन वेळा प्रयत्न केला होता. ती प्रतिकात्मक हत्या होती. 

शेवटी औरंगजेबाद्वारे सनातन्यांनी संभाजीराज्यांची अत्यंत निर्दयपणे हत्या केली. सर्व धर्मातील धर्मांध आतून एकच असतात. सनातनी आणि औरंगजेब यांनी संगनमताने संभाजी राजांची हत्या केली. औरंगजेब हा सनातनी विचारांचा होता. तो धर्मांध होता. त्याने वडील शहाजहानला कैदेत ठेवले होते. भावंडांना मारले. सुफी संत सर्मदला मारले. शिवरायांची बदनामी करण्यासाठी जसा लेन वापरला, तसे संभाजीराजांची हत्या करण्यासाठी औरंगजेब वापरला. संभाजीराजांनी संस्कृतवरती प्रभुत्व मिळवून धर्मक्षेत्रात सनातन्यांपुढे आव्हान उभे केले होते. त्यामुळे सनातन्यांनी त्यांची जीभ, डोळे, कान, शरीर यांचे तुकडे-तुकडे करून अमानुषपणे हत्या केली.

धार्मिक क्षेत्रात आव्हान उभे करणारांची हत्या करणे, ही सनातन्यांची प्राचीन परंपरा आहे. याची भारतीय इतिहासात अनेक उदाहरणं आहेत. बळीराजा, सर्वज्ञ चक्रधर, संत तुकाराम महाराज, डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, डॉ.कलबुर्गी, गौरी लंकेश इत्यादींची सनातनी व्यवस्थेनी केलेल्या हत्या ही त्याची उदाहरणे आहेत.

 हेमाद्री पंडिताने सर्वज्ञ चक्रधर यांचे डोळे, जीभ, नाक, कान कापून नंतर त्यांची हत्या केली, यासाठी पंडितांनी देवगिरीच्या यादवांना हाताशी धरले होते. चक्रधरांनी संस्कृतवर प्रभुत्व मिळवून ज्ञानाच्या क्षेत्रात सनातन्यांना आव्हान दिले होते. संत तुकाराम महाराजांनी संस्कृतवर प्रभुत्व मिळवून ज्ञानाच्या क्षेत्रात सनातन्यांना आव्हान दिले होते, त्यामुळे संत तुकाराम महाराजांची सनातन्यांनी निर्दयपणे हत्या केली. प्रत्यक्ष मारेकरी भाडोत्री असू शकतात, पण विचारधारा सनातन्यांची होती.

जागतिक कीर्तीचे इतिहासकार, संस्कृत पंडित अल्बेरूणी त्यांच्या तहकिकात-ए हिंद (११वे शतक) या अभिजात ग्रंथात लिहीतात की, “भारतात एखाद्या बहुजन व्यक्तीने संस्कृत भाषेवर प्रभुत्व संपादन केले तर सनातनी लोक त्या व्यक्तीची अत्यंत निर्दयपणे हत्या करतात. संस्कृत भाषा बोलली तर जीभ कापतात, संस्कृत ऐकले तर त्याच्या कानात तापलेले शिसे ओततात, संस्कृतकडे पाहिले तर त्याचे डोळे काढतात, संस्कृत भाषेत लेखन केले तर त्याच्या शरीराचे तुकडे-तुकडे करतात.” अशी घडलेली घटना त्यांनी त्यांच्या जगविख्यात ग्रंथात नोंदवलेली आहे. ती प्रत्यक्ष घडलेली घटना अल्बेरुनिने  पाहिलेली होती.

 छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळविले होते. संस्कृत अध्ययन आणि लेखन देखील केले होते. त्यांनी बुधभूषण नावाचा संस्कृत ग्रंथ देखील लिहिला आहे. संभाजी महाराजांच्या हत्येमागे हे एक कारण आहे. प्राच्यविद्या पंडित शरद पाटील म्हणतात “औरंगजेब हा मुसलमानामधील ब्राह्मण होता. तो क्रुर,निर्दयी होता. सनातन्याना अपेक्षित असणारी हत्या त्याने केली.”  संभाजीराजांच्या हत्येनंतर सनातन्यांना प्रचंड आनंद होणे स्वभाविक होते, कारण त्यांची संभाजीराजांना मारण्याची ईच्छापुर्ती झालेली होती. 

जसा छत्रपती प्रतापसिंह महाराज, राजर्षी शाहू महाराज आणि महात्मा गांधी यांच्या मृत्युनंतर सनातन्यांना आनंद झाला होता. याचे वर्णन प्रबोधनकार ठाकरे, थोर साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे इत्यादींनी केलेले आहे. अगदी त्या प्रमाणेच! त्या आनंदाप्रीत्यर्थ म्हणूनच त्यानी पालथा तांब्या, साडी, चोळी आणि त्यामध्ये बांबू अशा प्रतिकात्मक गुढ्या उभारायला सुरुवात केली. हे स्पस्ट होते. कारण आजच्या गुढीच्या स्वरूपाचे उल्लेख संत साहित्यात सापडत नाहीत. गुढीचे उल्लेख सापडतात, पण अशा स्वरूपाचे उल्लेख नाहीत. विशेषतः अशा प्रकारची गुढी महाराष्ट्रातच कशी?

 वारकरी संप्रदायाची गुढी भगव्या रंगाची आहे. गौतम बुद्धाचे चीवर भगव्या रंगाचे आहे. बुद्धाचे एक नाव “भगवा” असे आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा ध्वज भगव्या रंगाचा आहे. भगवा ध्वज ही भारताची अस्मिता आहे. भगवा ध्वज ही भारताची परंपरा आहे. त्यामुळे आपण घरावर भगवी पताका लावुन संभाजी महाराजांना अभिवादन करणे, घरावर भगव्या रंगाचा झेंडा हाच आपला गुढीपाडवा आहे.

Previous Post

अजब पेट्रोलची गजब गोष्ट! अति- अतिशुद्ध पेट्रोल 160 रुपये लिटर! पेट्रोल दरवाढीने उभारली गुडी!

Next Post

सरन्यायाधीशांचा सीबीआयवर जोरदार हल्ला – राजकारण्यांशी हितसंबंध तोडा … विश्वासार्हता उरली नसल्याची केली थेट टिका… सीबीआय, ईडीला स्वायत्त संस्थेच्या छताखाली आणले पाहिजे !

Next Post
सरन्यायाधीशांचा सीबीआयवर जोरदार हल्ला – राजकारण्यांशी हितसंबंध तोडा … विश्वासार्हता उरली नसल्याची केली थेट टिका… सीबीआय, ईडीला स्वायत्त संस्थेच्या छताखाली आणले पाहिजे !

सरन्यायाधीशांचा सीबीआयवर जोरदार हल्ला - राजकारण्यांशी हितसंबंध तोडा … विश्वासार्हता उरली नसल्याची केली थेट टिका… सीबीआय, ईडीला स्वायत्त संस्थेच्या छताखाली आणले पाहिजे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

coffee apple iphone smartphone

आता याची चोरी होते ! १४ कोटीचा डेटा चोरीला गेला !

May 21, 2022
शिरूरमधून चोरी गेलेली दुचाकी कर्जत पोलिसांकडून जप्त !

शिरूरमधून चोरी गेलेली दुचाकी कर्जत पोलिसांकडून जप्त !

May 20, 2022
वाई पोलिसांनी आरोपीसह ८५ हजारांच्या ४ दुचाकी केल्या जप्त !

वाई पोलिसांनी आरोपीसह ८५ हजारांच्या ४ दुचाकी केल्या जप्त !

May 20, 2022

बारामतीसह राज्यातील करिअर अकॅडमींच्या नफेखोरीचा बाजार उठणार? भरमसाठ शुल्कातून पालकांची सुटका होणार? राज्य शासनाने घेतली गंभीर दखल!

May 20, 2022

चक्क ‘बारामती’तून अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना आंबे पाठवले..! भसाळे यांचं निर्यातीचं ‘इंद्रधनुष्य’! महाराष्ट्रासह ‘बारामती’चा अमेरिकेत रोवला झेंडा..!

May 20, 2022

दुर्दैवी : पाहुण्याच्या गावात आलेल्या पाच जणी भाटघर धरणात बुडाल्या..! तिघींचे मृतदेह सापडले!

May 19, 2022

मुळशीमध्ये अविनाश बलकवडे यांनी आयोजित केला ‘धर्मवीर’ चा मोफत शो!

May 19, 2022

देवेंद्र फडणवीस उद्या (शुक्रवारी) इंदापुरात! नीरा नरसिंहपूरचा करणार दौरा!

May 19, 2022

मळद दरोड्यातील फरार अट्टल दरोडेखोरास यवत पोलीसांनी केले जेरबंद!

May 19, 2022
मतदानासाठी गावी निघालेल्या जोडप्याचा अपघात; पत्नीचा मृत्यू; पती गंभीर..

बारामतीत एमआयडीसीतील कंपनीत एका कामगाराचा मृत्यू ! डोक्यात लोखंडी रॉड पडला !

May 19, 2022
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group