मुंबई : महान्यूज लाईव्ह
महाराष्ट्र सरकारने कोरोनाचे सर्व निर्बंध हटविण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या मंत्रीमडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
मार्च २०२० पासून राज्यात कोरोनामुळे वेगवेगळे निर्बंध लागू होते. आता कोरोनाच्या रुग्णांची संख्या खुपच कमी झाल्याने हे निर्बंध हटविण्यास सुरुवात झाली होती. आज मात्र राज्य सरकारने सर्वच निर्बंध हटविले आहेत.
या पुढील महिन्यात गुढीपाडवा, रमजान ईद, डॉ. बाबासाहेब जयंती आणि इस्टर डे असे सर्वधर्मियांचे सण येत आहेत. त्यामुळे आता सर्वांना आपआपले सण उत्साहात साजरे करता येणार आहेत.
मास्क घालण्यापासून मिरवणूका काढण्यापर्यंतचे सर्व निर्बंध हटविण्यात आल्याने आता सर्व सामाजिक व्यवहार पुर्वीप्रमाणेच सुरु होऊन जनतेची आर्थिक गाडीही हळूहळू पुर्वपदावर येण्यास सुरवात होणार आहे.