बारामती : महान्यूज लाईव्ह
माजी मंत्री व आमदार सदाभाऊ खोत यांनी दोन दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य वापरत शरद पवार यांचे नाव आगलावे करा, कारण त्यांना काड्या करायची सवय आहे अशा स्वरूपाचे वक्तव्य केले होते. त्याचा समाचार राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अतिशय मार्मिक शब्दात घेतला असून सदाभाऊ खोत यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी खोत यांचाच एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे.
सदाभाऊ खोत यांनी दोन दिवसापूर्वी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर महाराष्ट्रातून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर केला. मात्र आमदार रोहित पवार यांनी ट्विट केलेला एक व्हिडिओ आता साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे भाजपचे सरकार असताना त्यावेळी राजू शेट्टी यांनी दुधाचे आंदोलन केले होते. त्यावेळी मंत्री असणारे व राजू शेट्टी यांचे प्रखर विरोधक बनलेले सदाभाऊ खोत यांनी या आंदोलनामागे असलेले सत्य उलगडले होते. आपण तीस वर्ष या आंदोलनात असून दुधाच्या आंदोलन दुधाचे आंदोलन कसे करतात हे आपल्याला चांगले माहीत आहे. त्यात दूध किती आणि पाणी किती हे मला चांगलेच माहिती आहे असे ते म्हणाले होते.
यावरून सदाभाऊ खोत यांनी स्वतःच तीस वर्षे केलेल्या आंदोलनाविषयीची किंमत स्वतः कमी करून घेतली होती. त्याचाच संदर्भ घेत रोहित पवार यांनी त्यांचाच हा जुना व्हिडिओ शेअर करून ज्यांच्या दुधातच पाणी आहे, त्यांची शुद्ध वाणी कशी असेल असा टोला लगावला आहे.