इंदापूर : महान्यूज लाईव्ह
भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना एफ आर पी चे थकित असलेले 34 कोटी 65 लाख रुपये कधी देणार असा सवाल शेतकरी कृती समितीच्या वतीने संचालक मंडळाला करण्यात आला आहे. याविषयीचे निवेदन कृती समितीच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आले आहे. ( Shri Chhatrapati Sahakari Sugar Factory at Bhawaninagar has asked the Board of Directors on behalf of the Farmers Action Committee when it will pay the arrears of Rs. 34 crore 65 lakhs of FRP. A statement in this regard has been published on behalf of the Action Committee.)
छत्रपती सहकारी साखर कारखान्याने चालू वर्षी सन २०२१-२०२२ मधील एफ आर पी ची रक्कम प्रतिटनी २५१५ रुपये निश्चित केली असून आज अखेरपर्यंत कारखान्याने सभासदांच्या खात्यावर फक्त २२०० रुपये जमा केले असून उर्वरित एफ.आर.पी चे ३१५ रुपये सभासदांचे खात्यात वर्ग करणे अद्यापही बाकी आहे.
वास्तविक पाहता ऊस दर नियंत्रण आदेश 1966 मधील कलम३ (३) च्या तरतुदीनुसार हंगामा मध्ये गाळप केलेल्या ऊसाचे १४ दिवसात एफ.आर.पी प्रमाणे पैसे ऊस पुरवठादारांना आदा करणे प्रत्येक कारखान्यावर बंधनकारक आहे.तसेच विहित कालावधीत एफ.आर.पी चे पैसे अदा न केल्यास कलम ३ (३अ) नुसार विलंब कालावधी करता १५ टक्के व्याज आकारण्याची तरतूद आहे. या कायद्यात आज अखेरपर्यंत केंद्र सरकारने कोणताही बदल केला नाही.
चालू हंगामातील एफ.आर.पी प्रतिटनी २५१५ रुपयांचा विचार करता ३७ हजार ७२५ रुपयांचे ऊस उत्पादक सभासदाचे नुकसान झाले. या नुकसानीस जबाबदार कोण? याचे उत्तर विद्यमान संचालक मंडळाने दयावे. नंतर ऊसाचे २५ मार्च आखेर २५ कोटी ४० लाख चे पेमेंट दिले हे सांगावे. पेमेंट देऊन सभासदांवर केलेले उपकार नसून ते विद्यमान संचालक मंडळाचे कर्तव्य आहे.हे लक्षात घ्यावे.
गेटकेन ऊसाचे मोठ्या प्रमाणावर प्रथम गाळप करन्यास प्राधान्य दिले परीनामी स्वतःच्या सभासदाचा ऊस रानात तसाच उभा आहे. परिणामी ऊसाला तुरे आले काहींचे तुरे जाऊन तुऱ्याचा दांडा राहिला त्यामुळे एकरी १० ते १५ टन ऊसाचे नुकसान झाले.
११ लाख मे.टन झालेल्या ऊस गाळपाची राहिलेली थकीत एफ. आर.पी ३१५ रूपये प्रमाने व त्यावरील व्याजाची १५% रक्कम सभासदांच्या खात्यावरती कधी जमा करणार याचा खुलासा करावा असे आव्हान शेतकरी कृती समितीच्या वतीने संचालक मंडळास करण्यात आले आहे.