सुरेश मिसाळ
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांचा वाढदिवस इंदापुरमध्ये उस्फूर्तपणे साजरा करण्यात आला. यावेळी शहरातील सर्व प्रभागात गारटकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला. तसेच विविध कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
शहरातील सावतामाळीनगर येथे शहरातील गुरु माऊली महिला भजनी मंडळाला लागणारे साहित्य ( हार्मोनियम, टाळ, सतरंजी इत्यादी ) खरेदी करण्यासाठी १८००० रुपयांचा चेक महात्मा फुले सत्यशोधक प्रतिष्ठानच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या हस्ते महिला भजनी मंडळाला सुपूर्द केला. त्याचबरोबर इंदापूर शहरातील चेतन अनिल ढावरे व निमगाव केतकी येथील सुप्रिया विठ्ठल राजगुरू यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होत पोलीस उपनिरीक्षक, पीएसआय पदी यशस्वीरित्या यश मिळवल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.
भारत सरकारच्या डाक विभागाच्या विमा योजनेची माहिती सर्वांनाच समजून सांगण्यासाठी डाक विभागाचे अधिकारी माननीय टिके मॅडम यांचाही सन्मान सत्कारमूर्ती प्रदीप गाटकर यांच्या हस्ते करण्यात आला. तर प्रभाग क्रमांक सातमधील पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने गारटकर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी नाविन्यपूर्ण उपक्रम सकाळी १० वा. पासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत राबविण्यात आले. यात दीडशे लोकांना ईश्रम कार्ड काढून देण्यात आले. ७५ लोकांचे महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नव्याने सभासद करण्यात आले. २५ जणांचे संजय गांधी निराधार योजनेचे फॉर्म भरून घेण्यात आले. पंधरा जेष्ठ नागरिकांचे श्रावणबाळ योजनेचे फॉर्म भरण्यात आले. ५० सदस्यांचा दि ओरिएंटल कंपनीचा एक लाख रुपयांचा विमा उतरवण्यात आला. पंधरा दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या कास्ट व्हॅलिडीटीचा फॉर्म भरण्यात आला. वरील सर्व योजना मोफत राबवण्यात आल्या. भारत सरकारच्या डाक विभागाच्या विमा योजनेची माहिती समजून सांगण्यात आली.
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी राष्ट्र सेवा दल पुणे जिल्हा ग्रामीण कार्याध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इंदापूर तालुका कामगार सेलचे अध्यक्ष रमेश आबा शिंदे, इंदापूर नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते पोपट शिंदे, विजय शिंदे, अक्षय भोसले, नानासाहेब लोंढे, चंद्रकांत सावंत, सोमनाथ लोंढे, शरद शिंदे ,राष्ट्र सेवा दलाचे राज्य मंडळ सदस्य गफूर सय्यद, महादेव शिंदे,दत्तात्रेय ढेरे ,तालुका कामगार सेल कार्याध्यक्ष संदीप अभंग,हनुमंत प्र.शिंदे, इत्यादी सदस्यांनी सहकार्य केले.
यावेळी सावता परिषदेचे संतोष राजगुरू व डॉ.शशिकांत तरंगे उपस्थित होते.