दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील पाटस येथील तानाजी भिंगारे हे सायकलवरून गावोगावी जाऊन भंगार गोळा करून आपल्या कुटूंबाचा उदानिर्वाह करीत आहेत. मात्र त्यांना मागील चार पाच दिवसांपुर्वी पॅरॅलिसिसच्या झटका आल्याने मेंदुमधील शस्त्रक्रीया करावी लागली आहे. बारामती येथील खासगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून ते कोमात आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती अंत्यत हलाकीचे आहे. कुटूंबात ते एकटेच कमावते आहेत. त्यामुळे आम्हाला आर्थिक मदत करा आणि आमच्या बाबांना वाचवा अशी कळकळीची विनवणी त्यांच्या मुलांनी केली आहे. ( Debris collector at Patas struggles with death! In a coma due to paralysis! Family appeal for financial help.!)
कोरोनाच्या महामारीमुळे मागील दोन वर्षापासून शहर आणि ग्रामीण भागातील जनजीवन पुर्णपणे उध्वस्त झाले होते. अनेकांना कोरोनाने आपल्यातून हिरावून नेले तर अनेकांचा रोजगार आणि कामधंदा गेला. मात्र कोरोनाच्या काळातही अनेकांनी माणसुकी जोपसली, या महामारीतही अनेकांनी आपआपल्या परीने शक्य तेवढी मदत केली. हीच माणुसकी आजही कायम आहे. याच माणसुकीसाठी पाटस येथील मृत्युशी झुंज देणारे तानाजी भिंगारे यांची मुले आपल्या बाबांना वाचविण्यासाठी मदतीची विनवणी करीत आहेत.
तानाजी भंगारे हे एकटेच घरामध्ये कमवते आहेत. दिवसभर गावोगावी सायकलीवरून फिरून भंगार गोळा करणे हा त्यांचा व्यवसाय. गेल्या तीन वर्षापासून कोरोनामुळे घरची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. मागील दोन-तीन वर्षापासून कोरोनामुळे घरात बसावे लागले. या काळात कर्ज काढून आणि उसनेपासने घेवून घर चालविले. त्यात त्यांच्यावर अगोदरच आर्थिक कर्ज आहे. मागील चार-पाच दिवसापूर्वी तानाजी यांना पॅरॅलिसिसचा झटका आला. त्यामुळे त्यांच्या शरीरातील वेगवेगळ्या शिरा चोकअप झाल्या. मेंदूला रक्तपुरवठा करणारी शिर चोकअप झाल्यामुळे ते कोमामध्ये गेले आहेत. बारामती येथील खासगी रूग्णालयात त्यांच्यावर मेंदूच्या शिरेचे ऑपरेशन झाले आहे. ऑपरेशनसाठी औषधाचा खर्च धरून दोन ते अडीच लाख रुपये खर्च आला आहे. तसेच गोळ्या औषधे ही खूप महाग असल्याने आतापर्यंत ६० ते ७० हजाराचा खर्च त्यावरील झाला आहे.
घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे भिंगारे कुटुंबीय सर्व समाजाला हात जोडून विनंती करत आहे, की आपण पुढे येऊन फुल ना फुलाची पाकळी म्हणून छोटीशी मदत करावी. आपल्या छोट्याशा आर्थिक मदतीमुळे आमचे बाबा बरे होतील. आपली मदत आम्ही आयुष्यबर विसरणार नाही. अशी विनवणी तानाजी यांचा मुलगा प्रथमेश तानाजी भिंगारे यांनी केली आहे.
मदतीसाठी संपर्क ः –
फोन पे – 8080535162
बॅंक अकाऊंटचा तपशील – AC Number. 60407181169
आयएफसीसी कोड – MAHB0000081
शाखा – हडपसर