मुंबई : महान्यूज लाईव्ह
गेल्या सात वर्षात बॅंक घोटाळ्यात झालेल्या नुकसानीची एकुण रक्कम किती आहे माहिती आहे ? रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियामध्ये गेल्या ७ वर्षात झालेले बॅंक घोटाळे किंवा फसवणूकीतून देशाचे दररोज १०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे सर्वांधिक म्हणजे ५० टक्के बॅंक घोटाळे महाराष्ट्रात झालेले आहेत.
महाराष्ट्र, दिल्ली, तेलंगणा, गुजरात आणि तामिळनाडू या पाच राज्यात मिळून सात वर्षात २ लाख कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक झाली आहे. ही रक्कम एकुण फसवणूक झालेल्या रकमेच्या ८३ टक्के आहे. मात्र यात दिलासा देणारी बाब एकच म्हणजे दरवर्षी बॅँक घोटाळ्यातील रक्कम कमी कमी होत आहे.
२०१५ – १६ मध्ये ६७,७६० कोटी, १६ – १७ मध्ये ५९९६६ कोटी, १७- १८ व १८ – १९ या दोन वर्षात प्रत्येकी ४५००० कोटी रुपयांपेक्षा कमी, १९ – २० या वर्षात २७६९८ कोटी, २०-२१ मध्ये १० ६९९ कोटी तर २१ – २२ वर्षाच्या पहिल्या ९ महिन्यात हा आकडा केवळ ६४७.९ कोटी रुपये आहे.
सर्वसामान्य लोक आपला पैसा विश्वासाने बॅंकेत ठेवतात. त्याच बॅंकांचे घोटाळे होत असल्याने सर्वसामान्यांचा बॅंकांवरील विश्वासही राहिला नाही. आता या परिस्थितीत सुधारणा होत आहे, हीच एक दिलासा देणारी बाब आहे.