सुरेश मिसाळ
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज इंदापूरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
आज सकाळी दहा वाजता इंदापूर शहरातील सावतामाळी नगर येथील संत सावता माळी मंदिर येथे विविध कार्यक्रम होतील. यावेळी ईश्रम कार्ड वाटप करणे, भारतीय डाक विमा फॉर्म भरणे, महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार नोंदणी, संजय गांधी निराधार योजनेचे फॉर्म भरून घेणे, जेष्ठ नागरिकांकरिता श्रावण बाळ योजना फॉर्म भरणे, विद्यार्थ्यांसाठी कास्ट व्हॅलिडीटी ऑनलाईन नोंदणी करणे, दि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी चा एक लाख रकमेचा ५० सदस्यांच्या मोफत मेडिक्लेम काढण्यात येणार असून ऑनलाईन योजनांच्या नोंदणींचा कार्यक्रम आज दिवसभर चालू राहणार असल्याची माहिती रमेश आबा शिंदे यांनी दिली.