शिरूर : महान्युज लाइव्ह
शिरूर तालुक्यातील कर्डेलवाडी येथे चाकूचा धाक दाखवून जबरी दरोडा टाकून १लाख २० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा व रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या ४८ तासात तीन आरोपींना अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.२६ रोजी शिरूर तालुक्यातील कर्डेलवाडी येथे चाकूचा धाक दाखवून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून हॉल मध्ये झोपलेल्या तीन महिलांचे तीन तोळ्यांचे एकूण १ लाख २० हजार रुपये किंमतीचे दागिने हे चोरून नेले होते.याबाबत रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात होता.
सदर घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तसेच रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी वेगाने सूत्र हलवत तपासाला सुरुवात केली होती. तसेच प्राथमिक तपासात मिळालेल्या प्राप्त माहितीच्या आधारे तपास पथक आरोपींच्या शोधासाठी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात रवाना करण्यात आले होते.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तसेच रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी आरोपींचा शोध घेत बहुळ,पुणे येथून रामचंद्र मनू भोसले,रमेश शंकर चव्हाण,सुभाष मैलारी भोसले (तिघेही रा.वाळुंज,पंढरपूर ता.जि.औरंगाबाद) यांना ताब्यात घेतले.या आरोपींनी सदरचा गुन्हा आणखी दोन आरोपींसोबत केला असल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
हा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलिस निरीक्षक अशोक शेळके,सहायक पोलिस निरीक्षक सचिन काळे सहायक पोलिस निरीक्षक अमोल गोरे सहायक फौजदार तुषार पंदारे,जनार्दन शेळके,राजू मोमीन, अजित भुजबळ,तसेच रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक बळवंत मांडगे,पोलिस उपनिरीक्षक सुहास रोकडे,दत्तात्रय शिंदे,विजय शिंदे,उमेश कुतवळ,विलास आंबेकर यांनी केला आहे.
पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सुभाष मुंढे हे करत आहे.