पुणे : महान्यूज लाईव्ह
22 नोव्हेंबर पासून कोठडीत असलेल्या माळेगावचे माजी सरपंच जयदीप तावरे यांना आज सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. आजच्या सुनावणी कडे बारामतीकरांचे लक्ष लागलेले होते. माळेगाव येथील जिल्हा परिषद सदस्य रोहिणी तावरे यांचे पती रविराज तावरे यांच्या गोळीबार प्रकरणात जयदीप तावरे यांना अटक करण्यात आली होती. ( Former Malegaon Sarpanch Jaideep Taware, who has been in custody since November 22, was granted bail by a sessions court here today. Baramatikar’s attention was drawn to today’s hearing. Jaideep Taware was arrested in connection with the shooting of Raviraj Taware, husband of Zilla Parishad member Rohini Taware in Malegaon.)
आज सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान एडवोकेट सचिन वाघ यांनी जयदीप तावरे यांच्या वतीने बाजू मांडली. दरम्यान हा जामीन मंजूर करू नये यासाठी युक्तिवाद केला होता. मात्र वाघ यांनी जामीन, मोका आणि कलम 169 चा रिपोर्ट या तीनही बाबी वेगवेगळ्या असून उच्च न्यायालयाने यापूर्वीच यासंदर्भात निर्देश दिलेले आहेत याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले.
रविराज तावरे यांच्यावर 31 मे 2021 रोजी माळेगाव येथे गोळीबार झाला होता. तावरे यांच्या वरील गोळीबारानंतर सात तासांत पोलिसांनी मुख्य आरोपी प्रशांत मोरे, विनोद मोरे, राहुल उर्फ रिबेल यादव याच्यासह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले होते. त्यानंतर जयदीप तावरे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर जयदीप तावरे त्यांना जामीनही मंजूर करण्यात आला होता. मात्र मोका कोर्टाने यासंदर्भात दिलेल्या निर्देशानंतर जयदीप तावरे हे पोलिसांना शरण गेले होते.