नाशिक : महान्यूज लाईव्ह
१५ वर्षे बंद अवस्थेत असलेल्या एका दुकानातून पोलिसांना मानवी मेंदू, ८ कान, डोळे आणि मानवी चेहऱ्याचा काही भाग सापडल्याने नाशिकच्या मुंबई नाका परिसरात आज एकच खळबळ माजली.
या दुकानातून दुर्गंध येत असल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी केल्यावरून पोलिसांनी हे दुकान उघडून तपासणी केली. हे दुकानात सगळे जुने सामान ठेवलेले होते. मात्र यातील दोन प्लास्टिक बरण्या जेव्हा उघडल्या गेल्या, त्यावेळी त्यामध्ये हे मानवी अवयव आढळून आले. पोलिसांनी दोन्ही प्लास्टिक बरण्या व मानवी अवयव जप्त केले असून तपासणीसाठी पाठविले आहेत.
या दुकानमालकाची दोन्ही मुले वैद्यकिय शिक्षण घेतलेली आहेत. त्यामुळे हे मानवी अवयव त्यांनी ठेवले असल्याचा संशय पोलिसांना आहे. ज्या पद्धतीने हे अवयव कापण्यात आले आहेत आणि केमिकलमध्ये ठेवण्यात आले आहेत, त्यावरून हे वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तीचे काम असल्याचे लक्षात येते. त्यामुळेच अजून याबाबत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही