मुंबई : महान्यूज लाईव्ह
पंजाबमधील आम आदमी सरकार दररोज नवे नवे निर्णय घेत आहे. आता स्वस्त धान्य दुकानातील धान्य लाभार्थींना घरपोच देण्याची योजना भगवंत मान सरकार सुरु करत आहे.
दिल्ली सरकारने यापुर्वी ही योजना सुरु करण्याचा प्रयत्न केला होता. परंतू दिल्ली हे पुर्ण राज्य नाही. त्यामुळे येथील अनेक निर्णय उपराज्यपालांच्या हातात आहेत. त्यामुळे ही योजनादेखील उपराज्यपालांची मंजुरी न मिळाल्याने रद्द करावी लागली होती.
पंरतू पंजाब हे पुर्ण राज्य असल्याने तेथील राज्यकारभार हा राज्यसरकारच्या अधीन आहे. त्यामुळे पंजाब सरकार स्वत: निर्णय घेऊ शकते.
या योजनेनूसार पात्र लाभार्थींना दिले जाणारे अन्न धान्य घरपोच केले जाईल. लाभार्थींना सरकारी कर्मचारी फोन करून ते घरी केव्हा असतील याची माहिती घेतील. त्यानंतर त्यांच्या सोयीनूसार रेशन घरपोच दिले जाईल. ज्यांना स्वत: येऊन रेशन न्यायचे आहे, त्यांना तसा पर्याय उपलब्ध आहे.
भगवंत मान यांनी व्हिडिओ संदेशाव्दारे या योजनेची माहिती दिली. यापुर्वीही पंजाब सरकारने अनेक निर्णय घेतलेले आहे. त्यामध्ये भ्रष्टाचाराची माहिती देणारी हेल्पलाईन सुरु करणे, ज्या शेतकऱ्यांच्या कापसाच्या शेतीचे नुकसान झाले आहे, त्यांना नुकसान भरपाई देण्यासारख्या निर्ययांचा समावेश आहे.