मुंबई : महान्यूज लाईव्ह
माजी पोलीस अधिकारी इसाक बागवान यांच्या मालमत्ता हस्तांतराचा मुद्दा हा कौंटुबिक मामला आहे, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत सांगितले. विरोधकांनी अंतिम आठवडा प्रस्तावात गृहखात्यावर आरोप केले होते. त्या आरोपांना उत्तर देताना ते बोलत होते. या प्रकरणी सविस्तर माहिती घेऊन निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
एन्टेलिया स्फोटकांच्या प्रकरणी एटीएस खऱ्या आरोपींपर्यंत पोहचत असताना राष्ट्रीय तपास यंत्रणेने हा तपास आपल्या हाती घेतला. या तपासाचे पुढे काय झाले याची अजून माहिती नाही. या प्रकरणात ज्यांनी पुढाकार घेतला ते बाहेर निर्धास्तपणे फिरत आहेत, असे वळसे पाटील म्हणाले. त्यांचा इशारा माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर होता.
अंगडियाकडून खंडणी घेतल्याचा आरोप असलेले आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठीला आजच फरार घोषित करण्यात आल्याची माहितीही वळसे पाटील यांनी दिली.