राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या पिस्तूल्या, फॅन्ड्री, सैराट आणि झुंड या सारखे चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक, लेखक, विचारवंत नागराज पोपटराव मंजुळे यांना पुणे येथील डी.वाय.पाटील विद्यापीठाने शुक्रवारी ( दि. २५) अत्यंत प्रतिष्ठित असलेली डी. लिट. पदवी (Doctor of Literature) ही पदवी प्रदान केली.

त्यांना ही पदवी देऊन सन्मानित केल्यानंतर नागराज मंजुळे यांच्या वर सोशल मीडियातुन अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. करमाळा तालुक्यातील रहिवासी असलेल्या नागराज मंजुळे यांनी पिस्तुल्या पासून चित्रपट सृष्टीत प्रवेश केला. फ्रेंन्डी आणि सैराट या चित्रपटालातर थेएटर मध्ये प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले.बॉक्स ऑफीसवर या चित्रपटाने धुमाळ घातला.
या चित्रपटाच्या यशानंतर नागराज मंजुळे यांनी बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली. सिने अभिनेते आणि चित्रपट सृष्टीतील भिष्माचार्य अमिताभ बच्चन यांना घेऊन झुंड या हिंदी चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदशिर्त झाला. या चित्रपटाने ही प्रेक्षकांना खेळवून ठेवले. अनेक चित्रपट सिने अभिनेते यांच्यासह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी या चित्रपटाबद्दल नागराज मंजुळे यांचे कौतुक केले.
शिव, फुले शाहू आंबेडकर यांचे विचारांचा समृद्ध वारसा असणाऱ्या नागराज मंजुळे यांनी आपल्या चित्रपटांमध्ये सामाजिक वास्तव दाखवून प्रस्थापितांना आवाहन दिले आहे. ग्रामीण भागातील आणि झोपडपट्टीतील नवखे कलाकारांना आपल्या चित्रपटांमध्ये संधी देऊन त्यांच्या कलागुणांना वाव दिला आहे.
आपल्या चित्रपटांमध्ये त्यांनी फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा कृतित उतरवली आहे. सामाजिक जाण आणि वास्तवाची जाण ठेवून नागराज मंजुळे यांनी बॉलिवूड व मराठी चित्रपट सृष्टीत एक नवे पर्व निर्माण केले आहे. शुक्रवारी नागराज मंजुळे यांना डी. वाय. पाटील विद्यापीठाने अत्यंत प्रतिष्ठित असलेला डी.लीट.ही पदवी देऊन सन्मान केला आहे. या सन्मानामुळे त्यांच्या चाहत्यांनी अभिनंदन केले आहे.